इचलकरंजी येथील कोल्हापूर रस्त्यावरील एका मोपेडच्या शोरूममध्ये(employee) काम करत असताना जोरदार विजेच्या धक्क्याने रविकुमार बनारसीलाल केसरवाणी (वय ३३, रा. गोकुळ चौक) या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी सकाळी ९ च्या सुमारास घडली. राजर्षी शाहू पुतळ्याजवळ असलेल्या एका मोपेड शोरूममध्ये रविकुमार कामास होता.
नेहमीप्रमाणे त्याने शोरूम(employee) उघडून कामाला सुरुवात केली. काम करत असतानाच त्याला अचानकपणे विजेचा धक्का बसला आणि तो जमिनीवर कोसळला. तो पडल्याचे पाहून तेथे असलेल्या अन्य कर्मचाऱ्यांनी त्याला तातडीने इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात दाखल केले; मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
इस्पितळात आणि घटनास्थळी त्याच्या नातेवाईक आणि नागरिकांनीही गर्दी केली होती. केसरवाणी हा अविवाहित होता. त्याच्या मागे आई, दोन भाऊ, बहीण असा परिवार आहे. घटनेची नोंद शिवाजीनगर पोलिस ठाण्यात झाली आहे.
हेही वाचा :
ठाकरे गटाच्या नेत्याकडून बाजार समितीच्या सभापतीला मारहाण
‘भविष्यात आपल्या कोणाकडेही जॉब नसेल’; इलॉन मस्क नेमकं काय म्हणाले?
मुंबई पोलिसांना ‘हीरामंडी’ सीरिजची भूरळ, पोस्ट पाहून अमृता म्हणाली…