हार्दिक नताशाच्या घटस्फोटाच्या बातम्यांवर पूर्णविराम! पांड्या या रशियन मॉडेलला करतोय डेट

टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यातील(divorce) अंतिम षटकात टिच्चून मारा करीत भारताला विजय मिळवून देणारा हार्दिक पांड्या पुन्हा एकदा भारतीयांसाठी हीरो झाला आहे. काही महिन्यांपूर्वी ट्रोलर्सकडून खलनायक ठरविला गेलेला हार्दिक पांड्या आता भारतीय विश्वविजयाचा नायक म्हणविला जातो आहे. पण, असे असले तरी हार्दिक पांड्याच्या वैयक्तिक आयुष्यातील वादळ थांबण्याचे नाव घेत नाही.

हार्दिक पांड्या आणि त्याची पत्नी नताशा स्टॅनकोव्हिच यांच्यात आलबेल नसल्याचे बऱ्याच दिवसांपासून बोलले जात आहे. कदाचित त्यांचा काडीमोडदेखील(divorce) होऊ शकतो, अशा बातम्याही पसरल्या होत्या. याचदरम्यान हार्दिक पांड्याचा एक फोटो सध्या जोरदार व्हायरल होत आहे. या फोटोवरुन सोशल मीडियावर विविध तर्कवितर्क लढवले जात आहे.

सोशल मीडियावर सध्या एक पोस्ट फारच व्हायरल होत आहे, ही पोस्ट हार्दिक पांड्याने टाकली नाही तर रशियन मॉडेल अलिना टुटेजाने तिच्या सोशल मीडियावर हार्दिक पांड्यासोबतचे काही फोटो पोस्ट केले आहेत. भारतीय संघाच्या विजयानंतर अलिनाने हे फोटो शेअर केले आहेत. ही छायाचित्रे एका जुन्या जाहिरातीतील आहेत, ज्यामध्ये हार्दिक पांड्या एका मॉडेलसोबत दिसत आहे. अलीनाने तीन फोटो शेअर केले आहेत. दोन फोटोंमध्ये ती हार्दिक पांड्यासोबत दिसत होती आणि तिसरा फोटो तिने शेअर केलेला चॅम्पियन टीम इंडियाचा होता.

हार्दिक पांड्या आणि टीम इंडियाचे फोटो असलेल्या पोस्टला कॅप्शन देताना अलिना टुटेजाने लिहिले की, “भारताला त्याच्या चॅम्पियन्सचा खूप अभिमान आहे, मी त्यांच्यापैकी एकासह माझे शूट करण्याचा निर्णय घेतला. हार्दिक पांड्याने मला त्याच्या टीमचा फोटो दिला.” अभिमान वाटतो.”

अलीनाने डेटिंगच्या बातम्यांना साफ नकार दिला आहे. तिने वेस्ट इंडिजचा माजी फलंदाज ब्रायन लारासोबतचा फोटोही शेअर केला आहे. त्या फोटोला कॅप्शन देत अलीनाने लिहिले होते, “मी कोणाला डेट करत नाही. अभिनेत्री आणि मॉडेल असण्याचा फायदा प्रसिद्ध लोकांसोबत काम करणे आहे.”

हेही वाचा :

आरक्षणाचं राजकीयीकरण प्रश्न भिजत ठेवला जातोय

महासत्ता चौकात दुचाकी-कार अपघातात दुचाकी चालकाचा मृत्यू

इचलकरंजीत नवीन स्पीड ब्रेकरवर पांढरे पट्टे नसल्याने अपघात वाढले: नागरिकांची तत्काळ उपाययोजनांची मागणी