केजरीवालांच्या अटकेनंतरही सत्ताधाऱ्यांच्या विरोधात रान उठवलं; कोल्हापुरात सामूहिक उपोषण

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने(rulers) अटक केली आहे. याला महिना उलटला असताना देखील कोल्हापुरात आजही त्याबाबत तीव्र नाराजी आणि निषेध व्यक्त केला जातोय.

आम आदमी पार्टीने आज याविरोधात आक्रमक पवित्रा(rulers) घेत आंदोलन करत सामूहिक उपोषण केले. याचाच पुढचा भाग म्हणून आम आदमी पार्टीने देशभरात एक दिवसीय सामूहिक उपोषण करून केजरीवालांना पाठिंबा व्यक्त केला. यावेळी सत्ताधारी भाजपचा त्यांनी निषेध व्यक्त केला.

यापूर्वी भाजप कार्यालयावर मोर्चा काढण्याचा प्रयत्न केल्याने कार्यकर्त्यांना अटक झाली होती. ईडीची प्रतिकात्मक होळी पेटवून निषेध नोंदवण्यात आला होता. केजरीवालांच्या समर्थनार्थ पक्षाने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.

केजरीवालांच्या अटकेने देशभरात जनक्षोभ उसळला आहे. ‘आप’ने आज देशभरात सामूहिक उपोषणाचे आयोजन करून केजरीवालांना पाठिंबा व्यक्त केला. ईडीकडून कोणतेही सबळ पुरावे न दिल्याने आपचे खासदार संजय सिंह यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. अशाच पद्धतीने बाकीच्या नेत्यांना देखील केवळ राजकीय सुद्बुद्धीने अटक केली असून गुन्हा सिद्ध करताना ईडी तोंडावर पडणार असल्याचे आप चे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई यांनी दिला.

यावेळी शहराध्यक्ष उत्तम पाटील, किरण साळोखे, सूरज सुर्वे, अभिजित कांबळे, दुष्यंत माने, आदम शेख, विजय हेगडे, प्रसाद सुतार, समीर लतीफ, संजय नलवडे, डॉ. कुमाजी पाटील, रमेश कोळी, राकेश गायकवाड, प्रथमेश सूर्यवंशी, अमरसिंह दळवी, आनंदा चौगुले, ईलाही शेख, आनंदराव वणिरे, विवेक भालेराव, मनोहर नाटकर, उमेश वडर, स्वप्नील काळे आदी उपस्थित होते.

हेही वाचा :

आजचे राशी भविष्य (08-04-2024)

10 लाख रुपयांपेक्षा कमी किंमतीत लवकरच लॉन्च होणार या 3 एसयूव्ही

गुढीपाडवा झाला गोड, सर्वसामान्यांना मोठा दिलासा, खाद्यतेल होणार स्वस्त