आपल्या चुकीच्या लाईफस्टाईलमुळे(health) वजन वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. फास्ट फूडचा थेट परिणाम आपल्या वजनावर होत आहे. त्यामुळे जिम, योग आणि इतर मार्गांनी हे वजन कमी करण्याचे प्रयत्न सुरू असतात. पण, काहीच जणांचे वजन कमी होते तर काहींचे जसेच्या तसे असते.
कधी कधी एवढी मेहनत करूनही वजन कमी करता येत नसेल तर त्यामागे अनेक कारणे असू शकतात. ही कारणं शोधली त्यावर उपाय केले तर कदाचित तुमचं वजन लवकर कमी होऊ शकतं.
सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट नमामी अग्रवाल म्हणतात की वजन कमी होण्यामागे अनेक घटक कारणीभूत असू शकतात. जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर तुमची जीवनशैली दुरुस्त करा. याशिवाय तुमची रक्त तपासणी करायला विसरू नका. तुमच्या वजन कमी करण्याच्या प्रवासाविषयी कोणती रक्त तपासणी अचूकपणे सांगेल याबद्दल आपण जाणून घेऊयात.
इंफ्लामेशनमुळे वजन कमी होत नाही
इंफ्लामेशन झाल्यामुळे वजन कमी करण्यातही अडचण येते. शरीरात इंफ्लामेशन होण्याची समस्या शोधण्यासाठी C-reactive प्रोटीन (CRP) चाचणीची शिफारस केली जाते. तुम्हाला सांगतो की शरीरात CRP वाढणे हे गंभीर आरोग्य स्थिती दर्शवते. अशा परिस्थितीत ही चाचणी नक्कीच करून घ्या. त्यावर योग्यवेळी उपाय केल्याने तुम्हाला वजन कमी होण्याच्या बाबतीत चांगला परिणाम दिसून येईल
व्हिटॅमिन डी
कदाचित तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की शरीरात व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे देखील वजन कमी करण्यात अडचण येते. तुमचे वजन कमी होत नसेल तर व्हिटॅमिन डीची चाचणी नक्की करून घ्या. तुमच्या लक्षात आले की, व्हिटॅमिन डीमुळे वजन कमी होत नाहीय तर तुम्ही रोज सकाळी सुर्याच्या प्रकाशात बसून योगा,व्यायाम करू शकता. त्यामुळे पुरेशा प्रमाणात वजन कमी होण्यास मदत होईल.
थायरॉईड असू शकतो
थायरॉईड हे देखील एक कारण आहे, ज्याने वजन अधिक वाढते आणि ते कमी होत नाही. ज्या लोकांना थायरॉईडची समस्या आहे त्यांना वजन कमी करण्यात खूप त्रास होतो. तुम्ही T3, T4 आणि TSH म्हणजेच थायरॉईडशी संबंधित सर्व रक्त चाचण्या करून घ्याव्यात. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, थायरॉइडची समस्या असल्यास चयापचय क्रिया मंदावते त्यामुळे वजन कमी होत नाही.
रक्तातील साखर
रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात नसली तरी वजन कमी करण्यात अडचण येते. कारण, तुम्ही सध्या डायटवर असला तरी पूर्वी गोड खाण्याच्या सवयीचा परिणाम आजही तुम्हाला भोगावा लागू शकतो. कारण, त्यामुळे, रक्तातील साखर वाढू शकते. यानेही तुमचे वजन कमी होण्यात अडथळा येऊ शकतो. यासाठी HbA1c चाचणी करावी म्हणजे इन्सुलिनचा प्रतिकार कळू शकेल.
हेही वाचा :
विप्रो सेन्सेक्समधून बाहेर; अदानी पोर्ट्सचा 30 कंपन्यांच्या यादीत प्रवेश
“केजरीवालांच्या निवासस्थानी घडलं ‘द्रौपदीचं वस्त्रहरण’”; भाजपच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
‘फेक बेबी बंप’ म्हणून झालेल्या ट्रोलिंगनंतर दीपिका आली समोर; Video