आचारसंहितेपूर्वीच महायुतीचे 7 नेते होणार आमदार; विधीमंडळात आज शपथविधी

राज्यात विधानसभा(political) निवडणुकांच्या तारखांची घोषणा कधीही होऊ शकते. मात्र, त्यापूर्वीच राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडताना दिसून येत आहे. राज्य सरकारकडून राज्यपाल नियुक्त 12 जागांपैकी 7 जागांसाठी उमेदवारांची नावे ही राज्यपालांकडे पाठवण्यात आली आहेत. सोमवारी याची यादी पाठवण्यात आली होती. विशेष म्हणजे एकाच रात्रीत या यादीला मंजूरी देखील मिळाली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(political) यांची मंजुरी मिळाल्यानंतर राज्यपालांकडे सोमवारी फाईल पाठवण्यात आली. त्यानंतर रात्री उशीरा राज्यपालांनी याला मंजुरी दिली आहे. त्यामुळे आजच (15 ऑक्टोबर) विधीमंडळतात उपसभापती निलम गोरे यांच्या उपस्थितीत सेंट्रल हॉलला सात आमदारांचा शपथविधी होणार आहे.

राज्यपाल नियुक्त 12 आमदारांपैकी 7 आमदारांची नावे निश्चित झाली आहेत. मात्र, 5 जागा या रिक्त ठेवण्यात आल्या आहेत. या 7 पैकी भाजपला 3 जागा, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला प्रत्येकी 2 जागा देण्यात आल्या आहेत.

‘या’ नेत्यांना मिळाली संधी
चित्रा वाघ (भाजपा)
विक्रांत पाटील (भाजपा)
बाबू सिंग महाराज राठोड (भाजपा)
पंकज भुजबळ (राष्ट्रवादी अजित पवार)
माजी महापौर इद्रिस नायकवडी (राष्ट्रवादी अजित पवार)
माजी खासदार हेमंत पाटील (शिवसेना शिंदे गट)
मनीषा कायंदे (शिवसेना शिंदे गट)

शिवसेनेकडून मनीषा कायंदे यांची नुकतीच टर्म संपली होती. आता त्यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. तर अजित पवार गटाने पंकज भुजबळ यांना संधी देत ओबीसी समाजाला प्रतिनिधीत्व देण्याचा प्रयत्न केला आहे. विधान परिषदेतील राज्यपाल नियुक्त 12 जागांचा तिढा बऱ्याच काळापासून प्रलंबित होता.

मविआ सरकार असताना राज्यपालांनी या यादीच्या मंजुरीला विलंब केला होता. त्यामुळे हे प्रकरण तेव्हा कोर्टात गेले होते. मात्र, आता विधानसभेपूर्वीच महायुती सरकारकडून या जागांची नियुक्ती व्हावी, यासाठी प्रयत्न करण्यात आले. आज राज्यपाल नियुक्त 12 आमदारांपैकी 7 आमदारांचा शपथविधी पार पडणार आहे.

हेही वाचा:

बॅनर काढताना विजेचा धक्का लागून तरुणाचा मृत्यू; कंपनीवर गुन्हा दाखल

विप्रोच्या शेअर्समध्ये 5% उसळी; 17 ऑक्टोबरला बोनस शेअर्सची भेट

आईशप्पथ, काय नाचतेय ही!’; ‘खेतों में तू आई नहीं’ गाण्यावर चिमुकलीचा धमाकेदार डान्स व्हायरल