होळीचा मोह बैलालाही आवरता आला नाही, थेट गर्दीत शिरला अन् … Video Viral

देशभरात होळीचा(Holi) सण मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात साजरा केला जातो. हा सण रंगांचा, आनंदाचा आणि वसंत ऋतूच्या स्वागताचे प्रतीक मानले जाते. यानिमित्त लोक एकमेकांना रंग लावून सणाचा आनंद लुटतात. देशाच्या विविध भागांत होळी वेगवगेळ्या प्रकारे खेळली जाते आणि सणाचा आनंद लुटला जातो.

याचे अनेक व्हिडिओज देखील सोशल मीडियावर शेअर होत असतात मात्र सध्या सोशल मीडियावर एक हैराण करणारा व्हिडिओ शेअर झाला आहे ज्यात होळी खेळणाऱ्या लोकांच्या गर्दीत चक्क एका पिसाळलेल्या बैलाने एंट्री घेतल्याचे दिसून आले. यांनतर पुढे काय घडले ते सविस्तर जाणून घेऊया.

बैल हा शांत प्रवृत्तीचा प्राणी असला तरी एकदा का तो पिसाळला की मग समोरच्याची काही खैर नाही. आताच्या व्हायरल व्हिडिओमध्येही असेच काहीसे घडल्याचे दिसून आले. व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, यात होळी(Holi) खेळण्यासाठी लोकांची गर्दी पाहायला मिळते.

लोक होळीचा आनंद लुटत असतात तितक्यात तिथे बैल येतो आणि सर्वांना आपल्या शिंगांनी मागे सारत तो तिथून पूढे पळू लागतो. सुरवातीला लोकांना काही समजत नाही मात्र काहीच क्षणात तिथे मीठ गोंधळ उडतो आणि लोक आपला जीव वाचवण्यासाठी तिथून पळ काढू लागतात. हे संपूर्ण दृश्य फार भयानक वाटू लागते मात्र यात फार काही लोकांना दुखापत झाली नसावी.

हा व्हिडिओ नक्की कुठला आहे ते अद्याप समजले नसले तरी याचा व्हिडिओ आता मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर शेअर केला जात आहे. व्हिडिओतील बैलाचा थैमान याहून युजर्स आता आवाक् झाले आहेत. दरम्यान या घटनेचा व्हिडिओ @yespriyanshu नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिले असून हजारोंनी यावर लाइक्स दिले आहेत.

तसेच अनेकांनी व्हिडिओवर कमेंट्स करत यावर आल्या प्रतिक्रियाहि व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “पळा पळा बाप आला आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “बैल म्हणत असेल, कुठे अडकलो मी” तर आणखीन एका युजरने लिहिले आहे, “व्वा, मजाच आली”.

हेही वाचा :

दुही माजवण्यासाठीच होतोय इतिहासाचा वापर?

आधी रोहित आता माधुरीबद्दल वादग्रस्त विधान; विधानसभेत काँग्रेस नेता म्हणाला, ‘दुय्यम दर्जाची..’

कोल्हापूरात बिबट्याची कातडी पोत्यात भरली, विक्रीसाठी बाजार गाठलं अन्…