मराठी मनोरंजनसृष्टीमध्ये सध्या चित्रपटांपेक्षा ‘मराठी बिग बॉस सीझन 5’ची अधिक(country) चर्चा आहे. या सीझनमध्ये मोठ्या प्रमाणात सोशल मीडिया स्टार्सचा समावेश असल्याने चाहत्यांमध्ये या पर्वाबद्दल विशेष उत्सुकता दिसून येत आहे. अभिनेता रितेश देशमुख या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत आहे. दर आठवड्याला भाऊचा धक्का म्हणत रितेश एक मोठं सप्राइज देतो.
नुकताच रितेशने पंढरीनाथ कांबळेंवर टीका करणारी जान्हवी(country) किल्लेकरला शिक्षा दिली. तसेच त्याने निकी तांबोळी आणि अरबाज पटेललाही खडे बोल सुनावले. मात्र स्पर्धकांना सुनावताना रितेशनं केलेल्या एका विधानामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.
झालं असं की, ‘बिग बॉस मराठी’ला सुरुवात होऊन चार आठवड्यांचा कालावधी उलटला आहे. या कालावधीमध्ये घरात वेगवेगळ्या जोड्या पाहायला मिळाल्यात. त्यामध्ये निकी तांबोळी आणि छोटा पुढारी म्हणून प्रसिद्ध असलेल्या घनश्याम दराडेमधील जवळीक सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत ठरली.
या दोघांमधील सोफ्यावर बसून केलेल्या संवादाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. यामध्ये निक्की आणि घनश्यामने लग्नासंदर्भात चर्चा केल्याचं पाहायला मिळालं. मात्र एका संवादादरम्यान निक्कीने घनश्यामला कर्मचारी म्हटलं. “तू कर्मचारी आहेस,” असं निक्की घनश्यामला उद्देशून म्हणाली. यावरुनच रितेश चांगलाच संतापल्याचं ‘भाऊचा धक्का’दरम्यान दिसून आलं. यावरुनच त्याने निक्कीला झापलं.
‘भाऊचा धक्का’दरम्यान रितेशने निक्कीला सुद्धा इशारा दिला आहे. “घरात चांगलं वागा नाहीतर, जेलमध्ये पुढचा नंबर तुमचा असेल” असं रितेशने निक्कीला सांगितलं आहे. मात्र निक्की तांबोळीला झापताना रितेशने थेट राजकीय संदर्भ दिला. “एक वेळ पंतप्रधान नसेल तरीही देश चालेल पण कर्मचारी पाहिजेतच. कर्मचाऱ्यांशिवाय देश चालू शकत नाही,” असं विधान रितेशने निक्काला झापताना म्हटलं. घनश्यामला हलक्यात घेऊ नकोस असं रितेशला निक्कीला सुचवायचं होतं.
‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या आठवड्यात रितेश देशमुखने घरात गैरवर्तन करणाऱ्या सगळ्या सदस्यांची शाळा घेताना जान्हवीला चांगलेच फैलावर घेतले. जान्हवीला आता आठवडाभर जेलमध्ये राहण्याची शिक्षा देण्यात आली आहे. जान्हवीला आता आठवडाभर तुरुंगात रहावं लागणार असं दिसत होतं. मात्र आता ती अचानक घरात दिसून आल्याचं नव्या प्रोमोमध्ये दिसत आहे.
या आठवड्यामध्ये तळाच्या 3 खेळाडूंमध्ये अभिजीत, वैभव आणि इरिना हे तीन स्पर्धक होते. अभिजीतला रितेशने सेफ केल्यानंतर घरातून वैभव जाणार की इरिना असा प्रश्न निर्माण झाला. अखेर या आठवड्यात इरिना एलिमिनेट झाल्याचं रितेशने जाहीर केलं. भावूक झालेल्या इरिनाने घराचा निरोप घेतला. भाऊच्या धक्क्यावर पाहुणे म्हणून अभिनेता श्रेयस तळपदे व अभिनेत्री कंगना रणौत देखील आले होते.
हेही वाचा:
के.पी. जाणार “मातोश्री” वर हाती घेणार ठाकरेंची “मशाल”
महाराजांच्या पुतळ्याच्या पायाशी अपघात झालेला चालेल का? : शशांक केतकर
गृहलक्ष्मी योजनेचे 2 हजार आले, आख्ख्या गावाला पुरणपोळीचं जेवण