महाराष्ट्र कुस्ती(wrestling) क्षेत्रातील बहुचर्चित निर्णयप्रकरणाला अखेर वळण लागलं आहे. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर महासंघाने मोठा निर्णय घेत आंतरराष्ट्रीय पंच नीतेश काबलिया यांना तीन वर्षांसाठी निलंबित केलं आहे. त्यांच्या निर्णयामुळे वाद निर्माण झाला होता आणि मल्ल शिवराज राक्षेवर अन्याय झाल्याचं स्पष्ट झालं आहे.

67 वी महाराष्ट्र केसरी कुस्ती(wrestling) स्पर्धा अहिल्यानगर येथे 29 जानेवारी ते 2 फेब्रुवारी 2025 दरम्यान झाली होती. गादी विभागाच्या अंतिम फेरीत पृथ्वीराज मोहोळ आणि शिवराज राक्षे यांच्यात कुस्ती झाली होती. मात्र पंच नीतेश काबलिया यांनी राक्षे चीतपट झाल्याचा निर्णय दिला, जो नंतर वादग्रस्त ठरला.
या निर्णयानंतर नाराज झालेल्या मल्ल शिवराज राक्षेने पंचांवर मारहाण केली होती, ज्यामुळे त्याच्यावर तीन वर्षांची बंदी घालण्यात आली होती. मात्र आता ही बंदी महासंघाने उठवली आहे, आणि राक्षेला पुन्हा कुस्तीत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.
महासंघाने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय पंच विलास कथुरे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन केली होती. या समितीच्या अहवालानंतर नीतेश काबलिया यांना राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धांमध्ये पंच म्हणून काम करण्यास बंदी घालण्यात आली आहे.

या निर्णयामुळे महाराष्ट्र कुस्ती महासंघाने पारदर्शकतेचा आणि न्यायप्रियतेचा संदेश दिला आहे. पंचांच्या चुकीच्या निर्णयामुळे एखाद्या मल्लाचे करिअर धोक्यात येऊ नये, याची जबाबदारी संघटनांनी घेतली पाहिजे, हे या निर्णयातून स्पष्ट झाले आहे.
शिवराज राक्षे याच्या संघर्षाला न्याय मिळाल्याने कुस्तीप्रेमींमध्ये समाधान व्यक्त होत आहे. हा निर्णय भविष्यात पंच आणि आयोजकांना अधिक जबाबदारीने वागण्यास भाग पाडेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा :
खळबळ! उपसरपंचाचा 16 वर्षीय मुलीवर बलात्कार; गर्भवती राहिली, मुलीला जन्म देताच नराधमाने..
काँग्रेसला धक्का! माजी नगराध्यक्षांसह 10 नगरसेवकांच्या हाती कमळ
अरबाज खान दुसऱ्यांदा बनणार बाबा? पत्नी शूरासोबतच्या क्लिनिक बाहेरील Viral Video