खळबळजनक ! दारूच्या नशेत तरूणाने वडिलांनाच जिवंत जाळलं; अन् नंतर…

अकोला : एका तरूणाने दारूच्या नशेत वडिलांनाच जिवंत(youth) जाळल्याचा धक्कादायक प्रकार जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील लोटणापूर येथे घडला. दारू पिऊन आलेल्या मुलाने खाटेवर आजारी असलेल्या वडिलांशी वाद घातला. रागाच्या भरात आजारी वडिलांनाच आग लावली. यामध्ये त्याच्या वडिलांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीला अटक करण्यात आली आहे.

धनेगाव येथील अजाबराव बापूसा इंगळे (वय 55) हे पत्नी व तीन मुलांसह मोलमजुरी(youth) करून लोटणापूरमध्ये भाड्याच्या खोलीत राहत होते. काही दिवसांपूर्वी अजाबराव यांना अर्धांगवायूचा झटका आला. त्यामुळे ते गंभीर आजारी झाले. त्यांच्यावर उपचार सुरू होते. घरात ते खाटेवरच पडून राहत होते. 14 जुलै रोजी दुपारी त्यांचा मुलगा आकाश अजाबराव इंगळे (वय 30) हा घरात दारू पिऊन आला.

आजारी वडिलांसोबत व्यसनाधीन मुलाचा वाद झाला. दोघांमधील वाद टोकाला गेला. आकाशने रागाच्या भरात घरातील पेटलेल्या चुलीतील आग आजारी वडिलांच्या खाटेला खालून लावली. वडिलांना त्या आगीच्या झळांमध्ये सोडून देत तो घरातून निघून गेला. खाटेवरील कपड्यांमुळे आग भडकली. आजारपणामुळे शरीराची हालचाल करता येत नव्हती. त्यातच मदतीसाठी घरात कुणीच नसल्याने ते आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले. या आगीमध्ये ते गंभीररित्या भाजले गेले.

दरम्यान, याप्रकरणाची माहिती समोर येताच आरोपी मुलाविरोधात बाळापूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी नराधम मुलाला अटक केली.

हेही वाचा :

निवडणुका जवळ आल्या की ‘लाडक्या’ योजनांचा पाऊस, मतदार संभ्रमात

केसांच्या समस्यांवर रामबाण उपाय! योगासनांनी मिळवा सुंदर व घनदाट केस

नोकरीसोबतच पूर्ण करा इंजिनीअरिंग, एमबीएचे स्वप्न! वर्किंग प्रोफेशनल्ससाठी खुली संधी