खळबळजनक! नवनीत राणांना पुन्हा धमकीचे पत्र, तीन दिवसांत दुसर्‍यांदा धमकी

अमरावती : भाजपच्या माजी खासदार(political updates) नवनीत राणा यांना आज पुन्हा एका धमकीचे पत्र मिळाले आहे. धक्कादायक बाब म्हणजे तीन दिवसांपूर्वीच याच व्यक्तींने पत्राद्वारे नवनीत राणा यांना धमकी दिली होती.दरम्यान नवनीत राणा आणि आमदार रवि राणा यांच्या घरी हैदराबादहून धमकीचे पत्र आल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.

आमिर नामक इसमाच्या नावाचा उल्लेख पत्रात असून नवनीत राणा(political updates) यांना सामूहिक अत्याचार करण्याची धमकी या पत्रातून देण्यात आलीय. तसेच, राणा दाम्पत्याच्या अमरावतील येथील घरासमोर गाय कापण्याची देखील धमकी पत्रातून देण्यात आली आहे. तर, पत्रात पाकिस्तान जिंदाबाद, असाही उल्लेख होता. तीन दिवसापूर्वीच हे धमकीचे पत्र आले असताना आज (सोमवार) पुन्हा अशाच पद्धतीचे पत्र आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

दरम्यान, या प्रकरणाच्या तपासासाठी अमरावती पोलीस हैदराबादमध्ये दाखल झाले असताना आज परत दुसरं धमकीचं पत्र नवनीत राणा आणि आमदार रवि राणा यांच्या घरी आले आहे. हे प्रकरण उजेडात येताच अमरावती पोलीस नवनीत राणा यांच्या घरी दाखल झाले आहे. तर पोलीस या प्रकरणाचा आता अधिक तपास करत आहे. तर मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणी राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली जाणार असल्याची माहिती पुढे आली आहे.

राज्यातील विधानसभा निवडणुकांची घोषणा पुढील काही दिवसांतच होणार आहे. त्यामुळे, सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले असून आपल्या मतदारसंघात निवडणुकांची तयारी करत आहेत. नवनीत राणा यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यामुळे आता विधानसभेला त्या मैदानात उतरणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. मात्र, त्यांचे पती आमदार रवि राणा यांनी विधानसभेची तयारी सुरू केली आहे. त्यादृष्टीने नवनीत राणा यांचाही प्रचार सुरू आहे.

मात्र, एकीकडे निवडणुकांसाठीची तयारी सुरू असतानाच त्यांना पत्राद्वारे धमकी देण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, नवनीत राणा यांनी हिंदू शेरणी म्हणून स्वत:ची ओळख पुढे केली आहे. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीत त्यांनी हैदराबादला जाऊन भाजपच्या प्रचारार्थ भाषणंही केले होते. अशातच नवनीत राणा आणि आमदार रवि राणा यांच्या घरी हैदराबादहून धमकीचे पत्र आल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.

विशेष बाब म्हणजे तीन दिवसापूर्वी नवनीत राणा यांना पाठविण्यात आलेल्या धमकी पत्राद्वारे संबंधित व्यक्तीने राणा दाम्पत्याकडे 10 करोड रूपयाच्या खंडणीची मागणी केली असून खंडणी दिली तरच पिच्छा सोडणार असल्याचा उल्लेख पत्रात केला होता. या पत्रात नवनीत राणा यांचे पति रवी राणा यांच्या विषयी वादग्रस्त शब्दांचा वापर करण्यात आला असून मी हैदराबादचा आहे, असेही त्याने सांगितले. तसेच, मी कोणत्याही पार्टीचा नाही.

माझा भाऊ वसिम ह्याने दुबईतून तुम्हाला कॉल केला होता. मात्र, तुम्ही तो फोन उचलला नाही, असे म्हणत संबंधिताने या पत्रात दुबाईतील भावाचा फोन नबंरही उल्लेख केला आहे. दरम्यान, हे पत्र संबंधित आमिर नावाच्या इसमाने आपल्या पत्नीच्या हाताने लिहिले असल्याचा दावा पत्रातून करण्यात आला आहे. याप्रकरणी, रवी राणा यांचे स्वीय सहाय्यक विनोद गुहे यांच्या तक्रारीवरुन पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलाय.तर आता परत आलेल्या पत्राचाही तपास पोलीस करत आहेत.

हेही वाचा:

देशातील सर्वात मोठ्या संस्थेत नोकरीची संधी; कुठे कराल अर्ज?

शिंदे सेनेचा विधानसभेसाठी पहिला उमेदवार जाहीर, ‘या’ आमदाराला दिली संधी

‘बाबा सिद्धीकींची हत्या करणाऱ्यांना फाशी देणार’, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं विधान