‘लाडकी बहीण’ योजनातून मुस्लिम महिलांना वगळा, नितेश राणेंच्या मागणीने धाकधूक वाढवली!

महायुती(Political)सरकारला जे मतदान करतात, जे पंतप्रधान मोदींवर विश्वास ठेवतात अश्या लाडक्या बहिणींना योजनेचा लाभ मिळाला पाहिजे. मतदान करताना यांना मोदी नको, हिंदुत्ववादी सरकार नको, मात्र मुसलमान समाज आमच्या योजनेचा लाभ घेतात. तुम्हाला जर तुमचा धर्म महत्त्वाचा असेल तर तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ कशाला घेता? असा सवाल करत भाजप आमदार नितेश राणे यांनी लाडकी बहीण योजनेवरून आगपाखड केली आहे.

तसेच मुख्यमंत्री(Political)लाडकी बहीण योजनेचे जास्तीत जास्त लाभार्थी हे मुसलमान समाजातील दिसतात, त्यामुळे मुख्यमंत्र्‍यांना विनंती करेन की आदिवासी समाज वगळता दोन पेक्षा जास्त आपत्य असलेल्या व्यक्तींना या योजनेतून वगळावे. त्यामुळे हिंदू समाजाला लाभ मिळेल अशी मागणी करत नितेश राणेंनी लाडकी बहीण योजनेवर भाष्य केलंय.

दरम्यान, नितेश राणेंनी लाडकी बहीण योजनेवरून केलेल्या विधानाच्या मुद्यावरून मविआ आणि महायुतीच्या नेत्यांनी आपली प्रतिक्रिया दिल्या आहे. याबद्दल बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, ही त्यांची मागणी आहे. मात्र यावर सरकार काय भूमिका घेईल ते घेईल. असे ते म्हणाले. तर योजना धर्मावर चालत नाही, धर्मावर योजना चालवायच्या असेल तर जाहीर करावे. या लोकांना मस्ती आली आहे.

ही धार्मिक तेढ निर्माण करून हिंदूंच्या कार्यक्रमात बोलावून देशातील एकात्मतेला धोका निर्माण करणाचे काम केलं जात असल्याची टीका करत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी असे बोलणं टाळावे असा सल्ला ही नितेश राणेंना दिला आहे.

‘पोलिसांना बाजूला करा, बांगलादेशींना जिवंत ठेवणार नाही’- नितेश राणे
बांगलादेशात ओळख विचारून मारलं जातंय, सामुहीक बलात्कार तर राजरोस सुरू आहेत. बांगला देशातील लोक इथे आहेत त्यांना आम्ही एक मिनीट तरी जिवंत का ठेवायच हा प्रश्न आहे.

पंतप्रधानांनी बांगलादेशला इशारा दिला आहे, आम्ही विनंती करतोय मोदींनी देशातले पोलीस बाजूला करा, इथले बांगलादेशींना आम्ही पाच मिनिटात शिल्लक ठेवणार नाही. यापुढचा मुक मोर्चा नसेल. बांगलादेशींना एका पायावर जाऊ देणार नाही. याला धमकी समजायची तर समजा. आपल्या देशात किती यांचे लाड करायचे? यांच्यासाठी किती योजना आहेत? मौलाना आझाद असूदे नाहीतर आणखी कीती योजना आहेत. लाडकी बहि‍णीच्या योजनाचा फायदा या लोकांनी घेतला. दोन अपत्य असणा-याना या योजनेचा फायदा देऊ नका, अशी विनंती मी मुख्यमंत्र्यांना करणार असल्याचे ही नितेश राणे म्हणाले.

हेही वाचा :

क्रिकेट सोडून धरली राजकारणाची वाट, पण मनसेने लावली ‘वाट’,

या बड्या नेत्याचा काँग्रेसला धक्का सहा पानांचा राजीनामा देत म्हटलं..

ऐन लग्नसराईत सोन्याचे भाव वाढले: 24 कॅरेटचे नवीन दर