कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : महाराष्ट्राच्या राजकीय(political) रंगमंचावर गेल्या पाच वर्षांपासून बिन पैशाचा तमाशा, संयुक्त मानापमान, लोच्या झालो रे, वेगळं व्हायचं मला, असे राजकीय विषयावरचे फुकटचे नाट्य प्रयोग सुरू आहेत. या प्रयोगांनी तमाम महाराष्ट्राचे भरपूर मनोरंजन केले.
आता गेल्या काही दिवसांपासून देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, संजय राऊत वगैरेंनी “संशय कल्लोळ” नाटकाचे प्रयोग सुरू केले आहेत. जनमताचा आदेश, जनमताचा कौल या महत्त्वाच्या बाबी या सर्वच मंडळींनी विंगेत नेऊन ठेवल्या आहेत. राजकारण्यांचा हा कोडगेपणा पाहून याचसाठी केला होता का अट्टहास अशी कपाळावर हात मारून म्हणायची वेळ सर्वसामान्य जनतेवर आली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काही दिवसांपूर्वी गडचिरोलीस गेले होते. या जिल्ह्यात आता एकही माओवादी शिल्लक दिसणार नाही. या जिल्ह्याला स्टील सिटी बनवणार असे त्यांनी तेथे सांगितले. त्यांच्यासमोर काही नक्षलिनी आत्मसर्पणही तेव्हा केले. त्यामुळे शिवसेनेचे संजय राऊत फारच भारावून गेले आणि त्यांनी सामना मध्ये अग्रलेख लिहून फडणवीसांचे भरभरून कौतुक केले.
एक तर तो राहील नाहीतर मी राहील अशी टोकाची भाषा करणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांची नागपूर हिवाळी अधिवेशनात स्वतंत्रपणे भेट घेऊन अर्धा तास चर्चा केली. त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर काल प्रभा आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. विविध प्रश्नांवर त्यांच्याशी चर्चा झाली. ही चर्चा सकारात्मक झाली. मुख्यमंत्री सकारात्मक आहेत. असे त्यांनी नंतर माध्यम प्रतिनिधींच्या जवळ बोलताना गोडवे गायले. या मंडळींच्या अचानक झालेला हा राजकीय बदल पाहिल्यानंतर ही मंडळी पुन्हा मैत्री करतील असा संशय का येऊ नये?
राजकारणात(political) उद्या काय होईल हे आज सांगता येणार नाही असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे आणि राजकारणात काहीही होऊ शकतं, राज ठाकरे हे आमचे मित्र आहेत आणि उद्धव ठाकरे हे आमचे शत्रू नाहीत असे देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत सांगून टाकले आहे. एकमेकांवर टोकाची टीका करणारे मकर संक्रातीच्या आधीच गोड गोड बोलू लागले आहेत. त्यामुळे यांची युतीच्या दिशेने पाऊले पडत आहेत की काय असा संशय येतो.
नागपूर पासून मुंबई पर्यंतच्या सर्व महापालिका निवडणुका आम्ही स्वबळावर लढवणार आहोत असे संजय राऊत यांनी नुकतेच म्हटले आहे. याचवेळी ठाकरे गटाचे अरविंद सावंत म्हणतात की विधानसभेच्या(political) निवडणुका स्वबळावर लढवावयास हव्या होत्या. या दोघांच्याही वक्तव्यामुळे महाविकास आघाडीमध्ये बिघाडीचे वातावरण तयार झालेले आहे. तर आघाडीतील अशा वातावरणामुळे शरद पवार हे नाराज आहेत. एकूणच ठाकरे यांच्या शिवसेनेला आता महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचे डोहाळे लागले आहेत. त्यातच संजय राऊत यांनी भाजप बरोबर आमची 25 वर्षे मैत्री होती याची आठवण करून दिली आहे.
तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजकारणात काहीही होऊ शकते असे म्हटल्यामुळे महायुती मधील घटक पक्षांच्या पायात त्यांनी साप सोडला आहे असे म्हणता येईल. फडणवीस आणि उद्धव ठाकरे या दोघांचीही भाषा कमाल पातळीवर मवाळ झाली आहे.
याचा अर्थ असा नाही की हे दोघेही पुन्हा एकत्र येतील. कारण ते तितके सोपे नाही. भारतीय जनता पक्षाने शिंदे गट आणि अजित दादा पवार गट यांच्याशी नवी राजकीय सोयरीक केली आहे. महायुती म्हणून त्यांनी विधानसभा निवडणूक लढवली आहे आणि जिंकली आहे. नव्या मित्रांना वाऱ्यावर सोडून जुन्या मित्राला जवळ करणे हे भारतीय जनता पक्षाला परवडणार नाही. पण त्यांनी संशय कल्लोळ मात्र तयार केला आहे.
एकनाथ शिंदे यांचा सरकार हे घटनाबाह्य होतं आणि सध्याच देवेंद्र फडणवीस यांचा सरकार हे ईव्हीएम सरकार आहे अशी कालपरवापर्यंत टीका करणारे उद्धव ठाकरे आज अचानक राजकारणात(political) उद्या काय होईल हे आज सांगता येत नाही असे म्हणून जातात याचा अर्थ त्यांची सध्याच्या सरकार बद्दलची राजकीय भूमिका बदलली आहे किंवा ती अधिक सौम्य झालेली आहे. आता महाविकास आघाडीमध्ये राहून संघटना वाढवता येणार नाही, संघटना वाढवायची असेल तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवल्या पाहिजेत अशी भूमिका ठाकरे यांनी घेतली आहे.
याचा अर्थ त्यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची तयारी चालवली आहे असा होतो. तर शरद पवार गटाच्या खासदार अमोल कोल्हे यांनी शिवसेना ठाकरे गट अजूनही झोपेतच आहे अशी घनाघाती टीका अचानक केली आहे तर विजय वडेट्टीवार यांनी जागा वाटपाचा घोळ लांबत गेला नसता किंवा त्यामध्ये वेळ गेला नसता तर विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला यश मिळाले असते. पण नाना पटोले आणि संजय राऊत यांच्यामुळे अपयश आले असा थेट आरोप केला आहे आणि त्यामुळेच महाविकास आघाडीत काहीतरी बिघडले आहे असे म्हटले तर चुकीचे होणार नाही.
हेही वाचा :
‘या’ 3 राशींचं उजळणार भाग्य, लक्ष्मीच्या पावलांनी येणार पैसा
पत्नीच्या निधनानंतर एकटेपणा घालवणं नडलं, दुसऱ्या लग्नाचा प्लॅन पण भलतंच घडलं
मकरसंक्रातीच्या गोडव्यात महागाईचा कडवटपणा! तिळाच्या दरात ‘इतक्या’ रुपयांची वाढ