काँग्रेसमधील गटबाजी चव्हाट्यावर; दोन गटात जोरदार राडा

शिर्डी : आगामी निवडणुकीसाठी राजकीय पक्षांकडून इच्छूक उमेदवारांच्या(candidate) मुलाखती घेण्याचे काम सुरू आहे. उमेदवारीसाठी प्रस्थापितांसह अनेक इच्छुकही निवडणूक लढवण्यासाठी उत्सुक आहेत. पण त्यातून अनेकांमध्ये जोरदार खटकेही उडत असल्याचे दिसत आहे. काही दिवसांपूर्वी पाथर्डी तालुक्यात भाजपच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीदरम्यान इच्छुकांमध्ये जोरदार राडा झाला होता. त्यानंतर आता काँग्रेसमधील गटबाजीही अशाच पद्धतीने चव्हाट्यावर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात उमेदवारांच्या(candidate) मुलाखती सुरू असताना दोन गटात जोरदार राडा झाला. काँग्रेसच्या एका गटाकडून श्रीरामपूर विधानसभेचे काँग्रेसचे विद्यमान आमदार लहू कानडे यांचा धिक्कार करत घोषणाबाजी करण्यात आली.

काँग्रेसमधून निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेले उमेदवार हेमंत ओगले यांनी शक्ती प्रदर्शन करत घोषणाबाजी केली. काँग्रेसचे पक्ष निरीक्षक आमदार, मुज्जफर हुसेने यांच्यासमोरचा असा गोंधळ उडाल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

दरम्यान, राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. सर्व पक्ष त्यासाठी कंबर कसून कामाला लागले आहेत. राज्यात महायुती विरूद्ध महाविकास आघाडी असा समाना रंगणार आहे. त्यासाठी राजकीय पक्षांकडून योग्य उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जात आहेत. पण या मुलाखतींदरम्यान प्रस्थापित विरुद्ध इच्छुक अशीच लढाई सुरू असल्याचे दिसत आहे.

हेही वाचा:

मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे पद व्हेंटिलेटरवर

‘लाडकी बहीण’चा चौथा आणि पाचवा हप्ता एकदम जमा होणार, पैसे मिळण्यासाठी किती दिवस राहिले?

कोल्हापूर उत्तर मतदारसंघावर शिवसेना ठाकरे गटाचा दावा; माजी खासदार विनायक राऊत काय म्हणाले?