‘आदित्य ठाकरेंना दिशा सालियन प्रकरणात अडकवण्यासाठी फडणवीसांनी…’, 300 कोटींचा उल्लेख करत आरोप

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विद्यमान उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस(political news todays) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. देशमुख यांनी म्हटले की, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांना अडकवण्याचा फडणवीसांचा प्लॅन होता. दिशा सालियन प्रकरणामध्ये आदित्य ठाकरेंचे संबंध असल्याचे प्रतिज्ञापत्र फडणवीसांनी माझ्याकडे स्वाक्षरीसाठी पाठवले होते. जर मी त्या प्रतिज्ञापत्रावर सही केली असती, तर उद्धव आणि आदित्य ठाकरे तुरुंगात गेले असते, असा खळबळजनक दावा देशमुख यांनी केला आहे.

देशमुख यांनी पत्रकार परिषदेमध्ये काही फोटो दाखवत(political news todays)फडणवीसांवर आरोप केले. त्यांनी समित कदम नावाच्या व्यक्तीचा उल्लेख करत फडणवीसांवर निशाणा साधला. देशमुख म्हणाले, “तीन वर्षांपूर्वी फडणवीसांनी समित कदम यांना माझ्याकडे पाठवले होते. समित कदम माझ्याकडे प्रतिज्ञापत्र घेऊन आले होते. समित कदम आणि फडणवीस यांचे जवळचे संबंध आहेत. नगरसेवक नसलेल्या या माणसाला फडणवीसांनी वाय दर्जाची सुरक्षा दिली आहे.”

देशमुख यांनी आरोप करताना असेही म्हटले की, “फडणवीसांचा उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि पार्थ पवार यांना अडकवण्याचा डाव होता. जर मी त्या प्रतिज्ञापत्रावर सही केली असती, तर आज उद्धव आणि आदित्य ठाकरे जेलमध्ये असते. आदित्य ठाकरेंवर दिशा सालियन प्रकरणासंदर्भातले आरोप होते. तसेच, उद्धव ठाकरे यांनी ३०० कोटी रुपये वसुली करण्यास सांगितले असल्याचा आरोप देखील त्या प्रतिज्ञापत्रात होता.”

देशमुख यांनी आणखी एक दावा केला की, “हा डाव फडणवीसांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवारांविरुद्ध वापरला होता. एकनाथ शिंदे यांच्या विरोधात डाव यशस्वी झाला, आणि अजित पवारांविरोधात देखील तो यशस्वी झाला.”

समित कदम यांनी देशमुख यांच्या आरोपांचे खंडन केले आहे. त्यांनी म्हटले, “अनिल देशमुख हे त्यावेळी राज्याचे गृहमंत्री होते आणि त्यांनी मला बोलावले होते म्हणून मी त्यांच्या घरी गेलो होतो. तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना माझ्या अडचणीत मदत करण्यासाठी त्यांनी विनंती केली होती.” देवेंद्र फडणवीस यांनी या गोष्टीशी कोणताही संबंध नसल्याचे समित कदम यांनी स्पष्ट केले आहे.

हेही वाचा :

भरवर्गातच शिक्षिकेने घेतली झोप; विद्यार्थिंनींना घालायला लावली हवा video…

कोल्हापूरात पावसाची विश्रांती, पूरस्थिती कायम; शाळा-महाविद्यालयांना आजही सुट्टी

शिवसेना नेत्याच्या मुलाचा विरारमधील रिसॉर्टमध्ये रहस्यमय मृत्यू; घटना CCTV मध्ये कैद