हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या अखेरच्या टप्प्याचे बांधकाम पूर्ण झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ड्रीम (project)प्रोजेक्टचा शेवटचा टप्पा, इगतपुरी ते मुंबई (76 किलोमीटर), फेब्रुवारीच्या अखेरीस उद्घाटनासाठी सज्ज आहे. यामुळे मुंबई ते नागपूर प्रवासाचा कालावधी 16 तासांवरून फक्त 8 तासांवर येणार आहे.
हा 6 लेनचा, 120 मीटर रुंदीचा आणि 150 किमी प्रतितास गतीसाठी डिझाइन केलेला (projectv)महामार्ग देशातील सर्वात अत्याधुनिक एक्सप्रेसवे आहे. यामध्ये 65 फ्लायओव्हर, 24 इंटरचेंज, 6 बोगदे आणि पादचारी तसेच वाहनांसाठी अंडरपास आहेत. इगतपुरीजवळील कसारा भागात 8 किलोमीटर लांब जुळ्या बोगद्यांपैकी एक अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे.
वन्यजीव आणि पर्यावरण संरक्षण:
महामार्गावर वन्यजीवांसाठी 80 हून अधिक संरचना तयार करण्यात आल्या असून 18 स्मार्ट टाऊन्सची उभारणी केली जाणार आहे. हे प्रकल्प स्थानिक वैशिष्ट्यांवर आधारित उद्योगांना चालना देतील.
महामार्गाचे फायदे:
महामार्गाच्या माध्यमातून राज्यातील 10 जिल्ह्यांना थेट तर 14 जिल्ह्यांना अप्रत्यक्ष कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. यामुळे सामाजिक आणि आर्थिक विकासाला गती मिळेल.
महामार्गाच्या उभारणीमुळे वेळ आणि इंधनाची मोठी बचत होईल, औद्योगिक मालवाहतुकीचा खर्च कमी होईल आणि अपघात कमी करण्यासाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मागील दोन वर्षांत या महामार्गावर 1.52 कोटी वाहनांनी प्रवास केला असून 1,100 कोटी रुपये टोलमधून जमा झाले आहेत.
महत्त्वाचा प्रकल्प:
67,000 कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेला समृद्धी महामार्ग केवळ प्रवास सुलभ करत नाही, तर महाराष्ट्राच्या औद्योगिक आणि सामाजिक प्रगतीचा कणा ठरणार आहे.
हेही वाचा :
पोस्टातील या योजनेत पैसे गुंतवा अन् निश्चिंत राहा, तुमचे पैसे नक्की दुप्पट होणार
“प्रसिद्ध अभिनेत्याचा फॅन मोमेंट: ‘भेटल्यावर KISS आणि गालाचा चावा!’ फॅनची हटके इच्छा
धनंजय देशमुखांचा आत्मदहनाचा इशारा; राज्य सरकार काय निर्णय घेणार?