गुरुवारी मुंबईमधील फोर्ट परिसरातील आझाद मैदानावर झालेल्या (Political)महायुती सरकारच्या शपथविधीसाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थाप शरद पवारांनाही निमंत्रण पाठवण्यात आलं होतं. या शपधविधी सोहळ्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या देवेंद्र फडणवीसांना तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे आणि (Political)राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांबरोबरच भाजपाशासित राज्यांचे मुख्यमंत्रीही उपस्थित होते. मात्र या सोहळ्याकडे विरोधकांनी पाठ फिरवल्याचं दिसून आलं. आता यावरुनच भाजपाने विरोधकांवर निशाणा साधला आहे.
हिच तर महाराष्ट्रविरोधी कोती मनोवृत्ती
— Keshav Upadhye (@keshavupadhye) December 6, 2024
काल आझाद मैदानावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून @Dev_Fadnavis यांचा तर @mieknathshinde व @AjitPawarSpeaks यांचा उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी झाला. या समारंभापासून व्यक्तीगत आमंत्रण देऊनही @uddhavthackeray @PawarSpeaks व कॅाग्रेसचे नेते…
“हिच तर महाराष्ट्रविरोधी कोती मनोवृत्ती,” असं म्हणत भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी विरोधकांवर शपथविधी सोहळ्यातील अनुपस्थितीवरुन सुनावलं आहे. “काल आझाद मैदानावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा तर एकनाथ शिंदे व अजित पवार यांचा उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी झाला. या समारंभापासून व्यक्तीगत आमंत्रण देऊनही उद्धव ठाकरे, शरद पवार व काँग्रेसचे नेते गैरहजर राहिले. हा लोकांनी निवडून दिलेल्या सरकारचा शपथविधी होता. लोकशाहीत लोकांनी दिलेला कौल स्वीकारून हे नेते शपथविधीला आले असते तर खरंच या नेत्यांना महाराष्ट्र हिताची व संविधानाची चाड आहे असा अर्थ निघाला असता. महाराष्ट्राचा विकासासाठी आम्ही एक आहोत असा संदेश दिला गेला असता,” असं केशव उपाध्ये यांनी म्हटलं आहे.
“2019 मध्ये उध्दव ठाकरे यांनी लोकांचा विश्वासघात करीत मविआसोबत मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तेव्हा त्या कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीस व तत्कालिन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील उपस्थित होते. त्यापूर्वीची उदाहरणे आहेत,” अशी आठवणही उपाध्ये यांनी करुन दिली. “निवडणुका संपल्या आता विकासासाठी आपण एक आहोत हा संदेश देता आला असता. मात्र पक्षीय स्वार्थापलीकडे आम्ही काहीच पाहू शकत नाही, महाराष्ट्राच्या हिताचा कोरड्या गप्पा मारतो व वेळ आली तर विरोधातच हेच या निमित्ताने या मंडळींनी दाखवून दिले,” असा टोलाही उपाध्ये यांनी आपल्या पोस्टमध्ये लगावला आहे.
आता तरी सुधरा….@rautsanjay61 , खोटं बोलायला अजून पाच वर्षं मिळाली असली, तरी त्याचा सदुपयोग करा. खोटं बोलून पदरात फक्त निराशाच पडते.
— Keshav Upadhye (@keshavupadhye) December 6, 2024
सोयीने आठवलेल्या बंद खोलीतल्या वचनांपासून
ईव्हीएम पर्यंत
धादांत खोटे बोलून,
वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि यशवंतराव चव्हाण यांचा वारसा सांगून…
“आता तरी सुधरा….” असं म्हणत उपाध्ये यांनी संजय राऊतांना टोला लगावला आहे. “संजय राऊत, खोटं बोलायला अजून पाच वर्षं मिळाली असली, तरी त्याचा सदुपयोग करा. खोटं बोलून पदरात फक्त निराशाच पडते. सोयीने आठवलेल्या बंद खोलीतल्या वचनांपासून ईव्हीएमपर्यंत धादांत खोटे बोलून, वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि यशवंतराव चव्हाण यांचा वारसा सांगून राजकारण करता, आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेतून साकार झालेल्या लोकशाहीच्या उत्सवावरच आक्षेप घेता?” असा सवाल उपाध्ये यांनी विचारला आहे.
“एवढंच होतं, तर काल उजळ माथ्याने शपथविधीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहायला हवं होतं. ईडी, सीबीआय, न्यायालय, निवडणूक आयोग, ईव्हीएम हे जनतेचे मुद्दे नाहीत. जनतेची समस्या काय आहे ते पाहून सोडवण्यासाठी लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या सरकारला मदत करा. नाहीतर आयुष्यभर खोटे अग्रलेख खरडत बसलात, तरी त्याचा परिणाम काय होतो, हे आत्ताच्या निकालांनी दाखवले आहे,” असा टोला उपाध्ये यांनी पोस्टमधून लगावला आहे.
हेही वाचा :
लाडक्या बहिणींचे 2100 रुपये कधी येणार? अर्ज छाननीबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांचे मोठे विधान!
असतं एकेकाचं नशीब….!…राजकारणात आले, आणि…
सोन्याचा दर झाला कमी, खरेदी करण्याची मोठी संधी