ऑस्ट्रेलियात फेल, इंग्लंडविरुद्ध टीम इंडियातून डच्चू… स्टार खेळाडूने अखेर उचलले मोठे पाऊल!

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर(Team India) भारतीय संघात मोठी उलथापालथ सुरू आहे. यामुळे भारताने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आपला संघही जाहीर केलेला नाही.

ऑस्ट्रेलियातील खराब कामगिरीनंतर (Team India)भारतीय संघावर प्रचंड टीका झाली. रोहित शर्मा आणि विराट कोहलीसह इतर खेळाडूंनाही देशांतर्गत क्रिकेट न खेळल्याबद्दल टार्गेट करण्यात आले.

दरम्यान, कसोटी क्रिकेटमध्ये भारताकडून तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाचा स्टार खेळाडू शुभमन गिलवरही ऑस्ट्रेलियातील खराब कामगिरीबद्दल प्रचंड टीका झाली. त्यानंतर इंग्लंडविरुद्ध टीम इंडियाच्या टी-20 संघातून पण वगळण्यात आले, दरम्यान, शुभमन गिलने मोठा निर्णय घेतला आहे. खरंतर, त्याने रणजी ट्रॉफी खेळण्याचा निर्णय घेतल्याची बातमी समोर येत आहे.

ऑस्ट्रेलियात शुभमन गिलने 3 सामने आणि 5 डावात 93 धावा केल्या. अशा परिस्थितीत, इंग्लंडविरुद्धच्या 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी निवड न झालेल्या गिलने पंजाबकडून रणजी ट्रॉफी सामने खेळण्याचा प्लान आखला आहे.

इंडियन एक्सप्रेसमधील वृत्तानुसार, शुभमन गिल कर्नाटकविरुद्ध सामन्यात पंजाबकडून खेळताना दिसेल. गिल ऑस्ट्रेलियामध्ये त्याच्या चांगल्या सुरुवातीचे मोठ्या डावात रूपांतर करू शकला नाही. तीन कसोटी सामन्यांमध्ये त्याचे धावसंख्या 31, 28, 1, 20 आणि 13 होती. त्यामुळे गिलच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले.

2024 हे वर्ष शुभमन गिलसाठी धमाकेदार होते. तो भारताकडून कसोटीत दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. ऑस्ट्रेलिया दौरा जर आपण बाजूला ठेवला, तर त्याने भारतात चमकदार कामगिरी केली. त्याने 12 सामन्यांच्या 22 डावात 3 शतके आणि 3 अर्धशतकांसह 866 धावा केल्या.

पण आशियाबाहेर गिलची कामगिरी खूपच खराब राहिली आहे. त्याने त्याच्या कसोटी कारकिर्दीतील पाचही शतके आशियामध्ये झळकावली आहेत. त्याने ऑस्ट्रेलियामध्ये फक्त 2 अर्धशतके केली आहेत.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर भारतीय संघ घरच्या मैदानावर इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आगे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील संघात शुभमन गिलला संधी मिळाली नाही. अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन सलामीवीर म्हणून खेळताना दिसतील. याशिवाय, यशस्वी जैस्वाल हा देखील एक सलामीचा पर्याय आहे. झिम्बाब्वे दौऱ्यावर गिलला कर्णधार बनवण्यात आले होते तर श्रीलंका दौऱ्यावर तो उपकर्णधार होता.

हेही वाचा :

आमिर खानच्या चित्रपटावर योगराज सिंहांची टीका: ‘वाहियात’ म्हणत संतापले चाहते!

28 जानेवारीपासून ‘या’ राशींवर होणार धनवर्षाव; नशीब उजळणार

मोठी बातमी : शक्तीपीठ महामार्ग कोल्हापुरातून होणार नाही, हसन मुश्रीफ यांची ग्वाही