सांगलीवरुन महाविकास आघाडीत बिघाडी! ठाकरे गटाचा टोकाचा इशारा

राज्यातील लोकसभा निवडणुकांचा धुरळा संपल्यानंतर सांगलीतील काँग्रेस(political campaign strategies) कार्यकर्त्यांचा स्नेहमेळावा पार पडला. या स्नेहमेळाव्याला आमदार विश्वजित कदम यांच्यासह काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांनी उपस्थिती लावल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या. मात्र आता या स्नेहमेळाव्यावरुन काँग्रेस- ठाकरे गटात वादाची ठिणगी पडली असून गल्लीपासून दिल्लीपर्यंतची काँग्रेस गद्दार असल्याचा घणाघात ठाकरे गटाचे सांगली जिल्हाध्यक्ष संजय विभुते यांनी केला आहे.

लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक चर्चा झाली ती सांगलीच्या(political campaign strategies) जागेची. ठाकरे गटाने चर्चेविनाच महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केल्याने काँग्रेसची मोठी कोंडी झाली. काँग्रेस नेत्यांनीही ठाकरेंची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र ठाकरे चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीवर ठाम राहिले. अनेक नाट्यमय घडामोडीनंतर शेवटी विशाल पाटील यांनी बंडाचा झेंडा फडकावत अपक्ष निवडणुकीला उभे राहिले अन् निवडणूक लढवली.

या निवडणुकीत विश्वजित कदम यांच्यासह काँग्रेस नेत्यांनी अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांचेच काम केल्याचा आरोप वारंवार केला गेला. अशातच निवडणुकीनंतर दोन दिवसांपूर्वी झालेल्या काँग्रेस नेत्यांच्या स्नेहभोजन मेळाव्यालाही अपक्ष उमेदवार विशाल पाटील हजर राहिले. यावरुनच आता शिवसेना ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे.

“लोकसभेच्या निवडणुकीपूर्वीपासूनच काँग्रेसचा आघाडीच्या उमेदवाराला विरोध होता.गल्लीपासून दिल्लीपर्यंत काँग्रेस गद्दार आहे. याचा पुरावा या स्नेहभोजनातून दिसून येतो,” असा घणाघाती आरोप ठाकरे गटाचे सांगली जिल्हाध्यक्ष संजय विभुते यांनी दिला आहे.

तसेच “काँग्रेसने तात्काळ शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील आणि बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांची पक्षातून हकालपट्टी करावी अन्यथा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये सांगलीमध्ये महाविकास आघाडी राहणार नाही,” असा इशाराही त्यांनी दिला आहे.

हेही वाचा :

आकर्षक लूक ,जबरदस्त सेफ्टी फीचर…; महिंद्राचा नवा मॉडेल लाँच

सांगलीच्या जागेवर जयंत पाटलांचा गौप्यस्फोट, ‘अपक्ष उमेदवाराची शिफारस…’

सचिनमुळे वाचला! अंगठी, पासपोर्टनंतर रोहित शर्मा मोबाईलही विसरला आणि मग…Video