कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : गर्भलिंग चाचणी प्रतिबंधक कायदा देशांमध्ये(marriage) सर्वप्रथम महाराष्ट्राने केला. तथापि दुर्दैवाने हा कायदा कोल्हापूर सह अनेक जिल्ह्यात निष्प्रभ ठरला आहे. मुलींना गर्भाशयातच मारले जाऊ लागले आहे. वाढत्या स्त्रीभ्रूण हत्येने स्त्री जन्म दर घटला आहे. त्यातून नवीनच एक सामाजिक समस्या निर्माण झाली आहे. त्याचे प्रतिकूल दृश्य परिणाम दिसू लागले आहेत.
बनावट वधू, बनावट वऱ्हाडी, औट घटकेचे लग्न हा गुन्ह्याचा(marriage) नवीनच प्रकार उदयास आला आणि त्याची सुरुवात सुमारे वीस वर्षांपूर्वी उत्तर महाराष्ट्रात झाली. तेथील अनेक पोलीस ठाण्यामध्ये फसगत झालेल्या तरुणांच्या कडून फिर्यादी दाखल झाल्या. गुन्हे नोंद झाले. तरुणांना लग्नासाठी मुलीचं मिळेनाशा झाल्या आहेत. किंवा त्या मिळवताना अनेक अडचणींना त्यांना सामना करावा लागतो आहे. “नकोशी” प्रवृत्तीतून ही सामाजिक समस्या अतिशय गंभीरतेने पुढे आली आहे. हिंदू धर्मात विवाह संस्कार हा 16 संस्कारांपैकी एक अतिशय महत्त्वाचा संस्कार मानला जातो. पण गेल्या काही वर्षांपासून विवाह समारंभाचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढू लागला आहे.
तो काही लाखांमध्ये जाऊन पोहोचला आहे. वाढलेल्या प्रचंड खर्चामुळे मुलीचे लग्न जमवताना आई-वडिलांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते आहे. त्यामुळेच गर्भलिंग चाचणी करण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले. गर्भ मुलीचा असेल तर तो आईच्या उदरातच मारण्याकडे कल वाढला. त्यातून स्त्री जन्मदर कमालीचा घटला. कोल्हापूर हा पुरोगामी विचारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. याच जिल्ह्यात गर्भलिंग चाचणीचे प्रमाण वाढले. त्यातून तत्कालीन जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांनी सोनोग्राफी यंत्रावर सायलेंट ऑब्झर्वर हे ॲप बसवले. हा उपाय प्रभावी ठरला. पण गेल्या काही वर्षांपासून पुन्हा गर्भलिंग चाचणीचे पेव फुटले.
मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या कमी झाली. त्याचे प्रतिकूल सामाजिक परिणाम हळूहळू दिसू लागले आणि आता ते अधिक तीव्र होऊन पुढे आले आहेत. तरुणांना लग्नासाठी मुली मिळेनाशा झाल्या आहेत. उपलब्ध असलेल्या मुलींच्या मुलाबद्दलच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत.
सध्या वधू वर सूचक मंडळांची संख्या वाढलेली दिसते. त्यापैकी काही मंडळे हे चांगल्या हेतूने काम करताना दिसतात पण काही वधू वर सूचक मंडळाच्या कडून आर्थिक लूट सुरू आहे. मुले आणि मुली यांच्यातील संख्या व्यस्त असल्याचा गैरफायदा काही मंडळी घेऊ लागली आहेत. त्यातूनच बनावट लग्नांचा फंडा राज्यात अनेक ठिकाणी पाहायला मिळू लागला आहे. दोनच दिवसापूर्वी कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यामधील दोन तरुणांची बनावट लग्नाच्या माध्यमातून लक्षावधी रुपयांची फसगत झालेली आहे. बनावट लग्न करणाऱ्या काही टोळ्या महाराष्ट्रात आहेत.
लग्नासाठी(marriage) इच्छुक असलेल्या तरुणांचा शोध घ्यायचा, त्यांना मुलगी दाखवायची, मुलगी पसंत पडल्यानंतर, मुलीच्या अंगावर सोन्याचे भरपूर दागिने घातले पाहिजेत अशी प्रमुख अट ठेवायची. मुलगी दाखवल्याबद्दल भरपूर मानधन उकळायचे. लग्नाचा कार्यक्रम अगदी घाईगर्दीत उरकून टाकायचा. लग्न झाल्यानंतर कसेबसे चार-पाच दिवस सासरच्या घरी नांदायचे आणि संधी साधून दागिन्यांसह पलायन करायचे.
अशी ही सर्वसाधारण गुन्हे करण्याची पद्धत आहे आणि याच पद्धतीचा वापर करून तरुणांना औट घटकेचा नवरा करून फसवायचे. अशा प्रकारचे गुन्हे राज्यात अनेक ठिकाणी घडले आहेत आणि घडत आहेत. गेल्या वीस वर्षात अशा प्रकारचे गुन्हे अनेक पोलीस ठाण्याचं दाखल होते. तथापि अशा बनावट लग्न गुन्ह्यात संबंधित तथाकथित वधूला आणि एजंटांना शिक्षा झालेली आहे असे ऐकिवात नाही. गुन्ह्याच्या या नव्या प्रकाराला”नकोशी”या प्रवृत्तीने जन्मास घातले आहे.
लग्नाचा खर्च परवडत नाही म्हणून मुलगीच जन्मास घालावयाची नाही ही प्रवृत्ती नष्ट करण्यासाठी कायदे कठोर केले पाहिजेत आणि त्याचबरोबर स्त्री जन्मदर वाढवण्यासाठी प्रयत्नही झाले पाहिजेत. गर्भलिंग चाचणी करण्याची, सोनोग्राफी यंत्रातील सुविधा कायमस्वरूपी काढून टाकण्याची तरतूद केली गेली पाहिजे. सोनोग्राफी यंत्रे तयार करणाऱ्या उत्पादकांना आरोग्य विभागाने आदेश दिले पाहिजेत. अन्यथा नकोशी प्रवृत्तीतून निर्माण झालेली सामाजिक समस्या अधिक गंभीर झाल्याशिवाय राहणार नाही.
लक्ष्मीकांत देशमुख हे कोल्हापूरचे जिल्हाधिकारी असताना त्यांनी गर्भलिंग चाचणी रोखण्यासाठी सायलेंट ऑब्झर्वर नावाचे ॲप सोनोग्राफी यंत्राला बसवण्याची शक्ती रुग्णालयांना केली होती. तिचे चांगले परिणाम दिसू लागल्यानंतर, या ॲपचे कौतुक होऊ लागले. महाराष्ट्राप्रमाणेच पंजाब मध्ये सुद्धा नकोशी प्रवृत्ती आहे. तिथे गर्भलिंग चाचण्या मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे लक्षात आल्यानंतर पंजाबच्या आरोग्यमंत्री खास कोल्हापूरला आल्या होत्या. त्यांनी सायलेंट ऑब्झर्वर यासंबंधीची माहिती घेतली. आणि तशाच प्रकारची उपाययोजना पंजाब मध्ये करण्यात आली.
हेही वाचा :
कांदा शेतकऱ्यांना हसवणार, ग्राहकांना रडवणार; ईदपूर्वी दरात तब्बल 50 टक्क्यांनी वाढ!
‘शिखांनी तुमच्या आया-बहिणींना वाचवलंय…’ पाकिस्तान खेळाडूच्या ‘त्या’ जोकवर हरभजनचा फिरला दांडपट्टा
सांगली हादरलं! हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या कोल्हापुरातील तरुणाचा सांगलीत निर्घृण खून