मुंबई: महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पावर कडवी प्रतिक्रिया देताना शिवसेना(budget planner) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारवर तीव्र टीका केली आहे. त्यांनी अर्थसंकल्पातील योजनांना ‘खोटं नरेटिव्ह’ म्हणून संबोधले आहे आणि सरकारच्या घोषणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
ठाकरे म्हणाले, “सरकारने सादर केलेला अर्थसंकल्प(budget planner) हा फक्त निवडणुकीसाठी असलेला एक दिखावा आहे. या अर्थसंकल्पात दाखवलेल्या योजनांची अंमलबजावणी होणार का, हे पाहणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणांची केलेली माहिती खरी असेल तर त्या अंमलात कधी येणार आहेत?”
ठाकरे यांनी सरकारवर आरोप केला की, “हा अर्थसंकल्प म्हणजे खोटं नरेटिव्ह सादर करण्याचा एक प्रयत्न आहे. वास्तविकता आणि या घोषणांमध्ये फार मोठा फरक आहे. सरकारने यापूर्वीही अनेक घोषणा केल्या आहेत, पण त्या पूर्ण झालेल्या नाहीत.”
ठाकरे यांच्या या टीकेनंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. त्यांच्या या प्रतिक्रियेने सरकारला आणखी दबावाखाली आणले आहे. आता सरकारने या टीकेला कसा प्रत्युत्तर देणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
हेही वाचा :
मोहम्मद शमीशी लग्नाच्या चर्चेदरम्यान सानिया मिर्झाने स्पष्ट सांगितलं, ‘या’ अभिनेत्यासोबत…
दो दिल मिल रहे है… कंगना रणौत-चिराग पासवान संसदेत पुन्हा एकत्र
अजित पवारांचे ‘बजेट’: 3 सिलेंडर मोफत, महिन्याला 1500 रुपये आणि इतर टॉप 10 घोषणा