कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : पाण्याबाहेर मासा तडफडतो. तसं महाराष्ट्रातील काही राजकारणी कुटुंबांचं झालय. या कुटुंबातील सदस्य राजकारणा(political news todays) पलीकडचा विचार करू शकत नाहीत. कारण राजकारण हा जणू त्यांचा जगण्याचा ऑक्सिजन आहे. राजकारणात, सत्ताकारणात ते नसतील तर त्यांचा जीव गुदमरतोय, पाण्याबाहेरील माशासारखा. महाराष्ट्राच्या राजकारणात हे अनेक ठिकाणी पाहायला मिळतंय आणि त्याला निमित्त घडतंय विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच. काही नेत्यांच्या घरातील सदस्यांनी उमेदवारी मिळवण्यासाठी ते सध्या असलेल्या राजकीय पक्षांना राम राम ठोकला आहे आणि नव्या ठिकाणी राजकीय सोयीची सोयरीक केली आहे.
नवी मुंबईचे गणेश नाईक. सुरुवातीला शिवसेनेत(political news todays) होते. तेथे त्यांना मोठी संधी मिळाली. आमदार झाले. त्यानंतर ते शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत दाखल झाले. मंत्री झाले. त्यांचा मुलगा संजीव नाईक हा वयाच्या 23 व्या वर्षी नवी मुंबईचा महापौर बनला. नंतर गणेश नाईक हे भारतीय जनता पक्षात दाखल झाले. त्यांना ऐरोली मतदारसंघातून आणि त्यांचे चिरंजीव संदीप नाईक यांना बेलापूर मधून भाजपचं तिकीट हवं होतं. एकाच घरात दोन तिकिटे कशी देता येतील म्हणून भारतीय जनता पक्षांने गणेश नाईक यांना तिकीट दिले. त्यामुळे नाराज झालेल्या संदीप नाईक यांनी भाजपचा कमळ सोडलं आणि शरद पवार गटाची तुतारी हाती घेतली आहे. एकूणच नाईक कुटुंबाला सर्वच पदे आपल्याच घरी असली पाहिजेत असे वाटते आहे असे म्हणता येईल.
महायुती मधील जेष्ठ कॅबिनेट मंत्री छगन्य भुजबळ यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली ती शिवसेनेतून. मुंबई महापालिकेचे ते दोन वेळा महापौर होते. आमदारही झाले. त्यानंतर त्यांनी अचानक शिवसेनेत बंड करून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तेथे ते मंत्री झाले. शरद पवार यांनी काँग्रेस सोडली आणि राष्ट्रवादी काँग्रेस हा स्वतंत्र पक्ष स्थापन केला तेव्हा छगन भुजबळ हे राष्ट्रवादीत आले. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजितदादा पवार यांनी बंडाळी केल्यानंतर ते शरद पवार यांची साथ सोडून दादा गटात आले आणि मंत्रीही झाले.
आता त्यांना येवला मतदारसंघातून अजितदादा पवार गटाची उमेदवारी मिळाली आहे तर त्यांचे चिरंजीव पंकज भुजबळ यांनाही उमेदवारी देण्यात आली आहे. पण त्यांचे पुतणे समीर भुजबळ यांनाही उमेदवारी हवी होती. त्यांना ती मिळाली नाही. म्हणून ते आता शरद पवार यांच्या गटाची तुतारी हाती घेणार आहेत. ते सध्या अजितदादा गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई प्रदेशचे अध्यक्ष होते. आता त्यांचा राजीनामा घेतला जाणार आहे.
नारायण राणे यांचा राजकीय प्रवास हा शिवसेनेतूनच सुरू झाला. बाळासाहेब ठाकरे यांच्या खास मर्जीतले म्हणून त्यांना पहिल्यांदा मुंबई महापालिकेवर जाता आले. बेस्टचे ते सभापती होते. त्यानंतर ते आमदार झाले. शिवसेनेचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सुद्धा बनले. पण शिवसेनेला आता फारसे राजकीय भवितव्य राहिलेले नाही, शिवसेना पुन्हा सत्तेत येणार नाही असा विचार करून त्यांनी शिवसेनेत बंड केले आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
काँग्रेसने त्यांना संधी असूनही मुख्यमंत्री बनवले नाही म्हणून ते काँग्रेस मधून बाहेर पडले. स्वतःचा स्वाभिमानी नावाचा पक्ष काढला. नंतर तो भाजपामध्ये विलीन केला. नंतर ते केंद्रीय मंत्री बनले. त्यांचे एक चिरंजीव नितेश राणे हे आमदार बनले. आता एकदा खासदार झाल्याने निलेश राणे यांना आमदारकीचे डोहाळे लागलेले आहेत. भाजपने त्यांना तिकीट नाकारले आहे त्यामुळे त्यांनी महायुतीच्या घटक पक्षात म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेनेच्या तिकिटावर ते विधानसभेची निवडणूक लढवणार आहेत.
कोल्हापूरचे महादेवराव महाडिक आणि त्यांचं कुटुंब असाच राजकारणात(political news todays) आणि सत्ताकारणात रमलेल आहे. ताराराणी आघाडी ते राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस ते भारतीय जनता पक्ष असा या कुटुंबाचा राजकीय प्रवास आहे. महादेवराव महाडिक यांचे पुतणे धनंजय महाडिक हे भाजपचे राज्यसभा सदस्य आहेत. त्यांचे चिरंजीव अमोल महाडिक हे भाजपचे आमदार होते आणि आताही ते भाजपकडून निवडणूक रिंगणात आहेत. त्यांच्या पत्नी शौमिका महाडिक ह्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा होत्या. सध्या त्या गोकुळच्या संचालिका आहेत.
धनंजय महाडिक यांना त्यांचे चिरंजीव कृष्णराज महाडिक यांना राजकारणात लॉन्च करावयाचे आहे. पण एका घरात भाजपची दोन तिकिटे देता येत नाहीत. म्हणून मग अडचण झालेल्या खासदार धनंजय महाडिक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतून कृष्णराज याला उमेदवारी देण्याचा कसोशीने प्रयत्न सुरू केला आहे. त्यांना कोल्हापूर उत्तर मधून उमेदवारी हवी आहे.
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतेज पाटील हे विधान परिषदेचे सदस्य आहेत. ते पालकमंत्री होते. त्यांचे पुतणे ऋतुराज पाटील हे कोल्हापूर दक्षिणचे विद्यमान आमदार आहेत. आणि पुन्हा त्यांनाच काँग्रेसची उमेदवारी निश्चित आहे. सतेज पाटील यांच्या ताब्यात गोकुळ दूध संघ आहे. महाराष्ट्रात राजकारणात असलेली काही राजकीय कुटुंबे ही सर्व पदे आपल्याच घरात असली पाहिजेत यासाठी प्रयत्नशील असतात. महापालिका, जिल्हा परिषद, विधानसभा,लोकसभा यापैकी कोणते ना कोणते पद आपल्याच घरात असले पाहिजे यासाठी ही मंडळी या पक्षातून त्या पक्षात अशी ये जा करत असतात. घराच्या चौकटीच्या बाहेर ही मंडळी विचारच करू शकत नाहीत.
हेही वाचा:
एका जातीवर निवडणूक लढवता येणार नाही, मनोज जरांगेंचं मोठं वक्तव्य
काळ आला की मृत्यू अटळ आहे! पाहा वेळ आली माणूस कसा जाळ्यात अडकतो video
पुष्पा 2 चा प्रदर्शनाआधीच बॉक्स ऑफिसवर डंका, प्रीरिलीजची कमाई 1000 कोटींहून अधिक