स्टाईल चित्रपटातून प्रसिद्ध झालेला अभिनेता साहिल खान याने ९ फेब्रुवारी(be younger) रोजी दुबईत आर्मेनियामध्ये जन्मलेल्या मिलेना ॲलेक्झांड्राशी लग्न केले. लग्नानंतर, १४ फेब्रुवारीला ‘व्हॅलेंटाईन डे’ निमित्त त्यांनी बुर्ज खलिफा येथे एका मोठ्या रिसेप्शनचे आयोजन केले होते. साहिलचे हे दुसरे लग्न आहे. याआधी त्याचे लग्न इराणी वंशाच्या नॉर्वेजियन अभिनेत्री निगार खानशीझाले होते, पण हे लग्न फार काळ टिकले नाही. २००४-०५ मध्ये ते दोघे फक्त दहा महिने एकत्र होते. साहिलचे दुसरे लग्न त्याच्या आणि पत्नीमधील वयाच्या अंतरामुळे चर्चेत आले आहे. साहिल ४८ वर्षांचा असून त्याची पत्नी मिलेना अवघ्या २२ वर्षांची आहे. या दोघांमध्ये २६ वर्षांचे अंतर आहे.

यावर साहिलने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मौन सोडले आहे.एका मुलाखतीत साहिल म्हणाला, “प्रेमाची परिभाषा वयाने ठरवता येत नाही आणि आमचेही तसेच काहीसे आहे. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर एकमेकांना समजून घेणे आणि सोबत पुढे जाणे म्हणजेच प्रेम, असे मिलेनालाही वाटते. मी जेव्हा मिलेनाला भेटलो, तेव्हा ती फक्त २१ वर्षांची होती आणि मी लगेच तिच्याकडे आकर्षित झालो. मला वाटते की, ही(be younger)परस्पर भावना होती, कारण तीसुद्धा माझ्याकडे आकर्षित झाली होती.”
“मिलेना वयाने लहान असली, तरी ती खूप समजूतदार आहे आणि तिला आयुष्याची चांगली समज आहे. तिचे विचार खूप स्पष्ट आहेत. आम्ही आमच्या भविष्याबद्दल बोललो आणि त्यानंतरच आम्ही पुढचे पाऊल उचलले. एकमेकांच्या कुटुंबीयांशी ओळख करून दिल्यानंतर आम्ही साखरपुडा केला. आता लग्नानंतर आम्ही दोघेही खूप आनंदी आहोत. मिलेना ॲलेक्झांड्रा माझी पत्नी आहे आणि आम्ही एकमेकांसोबत खूप आनंदी आहोत,” असे साहिलने सांगितले.

साहिलने सांगितले, “आम्ही रशियातील मॉस्को येथे पहिल्यांदा भेटलो. ती तिच्या आईसोबत एका रेस्टॉरंटमध्ये जेवायला आली होती आणि मी माझ्या मित्रांसोबत गेलो होतो. मी तिला मॉडेलिंग फोटोशूटची ऑफर दिली, पण तिने नम्रपणे नकार दिला. ती लग्नासाठी मुलगा शोधत होती. तिचा साधेपणा (be younger)आणि प्रामाणिकपणा पाहून मी तिच्याकडे आकर्षित झालो आणि त्याचवेळी मला समजले की, मला तिच्याशी लग्न करायचे आहे. तिथूनच आमच्या प्रेमकहाणीला सुरुवात झाली.”साहिल खानने २००१ मध्ये ‘स्टाईल चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यात त्याच्यासोबत शर्मन जोशीने मुख्य भूमिका साकारली होती. २००३ मध्ये आलेल्या ‘एक्सक्युज मी’ या चित्रपटातही दोघांनी काम केले. याशिवाय साहिलने ‘अलादिन’ , ‘डबल क्रॉस’ ‘रामा: द सर्वाइव्हर’ या चित्रपटांमध्येही काम केले आहे.
हेही वाचा :
लग्नासाठी नवरदेव सजला पण घोड्यावरच घेतला अखेरचा श्वास, मृत्यूचा थरारक Video Viral
LIC ने पॉलिसीधारकांसाठी लाँच केला नवीन प्लॅटफॉर्म
गुंतवणूकदारांसाठी आकर्षक संधी! ‘ही’ कंपनी देत आहे एका शेअर वर एक शेअर बोनस!