प्रसिद्ध अभिनेत्री अदिति राव हैदरीचा पती आणि दाक्षिणात्य अभिनेता सिद्धार्थ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. त्याने अल्लू अर्जूनची प्रमुख भूमिका असलेल्या(Entertainment news) ‘पुष्पा 2: द रुल’बद्दल एक खोचक विधान केलं असून यावरुनच तो टीकेचा धनी ठरत आहे. सोशल मीडियावर सिद्धार्थने केलेल्या विधानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. पाटण्यामध्ये चित्रपटाच्या प्रदर्शनाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाबद्दल बोलताना सिद्धार्थने अशा कार्यक्रमाची तुलना थेट जेसीबीने खोदकाम सुरु असताना जे बघे जमतात त्यांच्याशी केली आहे. त्यामुळेच अल्लू अर्जूनचे अनेक चाहते सिद्धार्थवर टीका करत आहेत.
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये सिद्धार्थने केलेल्या विधानावरुन वाद निर्माण झाला आहे. सिद्धार्थने (Entertainment news)’पुष्पा 2: द रुल’च्या प्रदर्शनाच्या दिवशी गोळा झालेले अनेकजण हे अल्लू अर्जूनेच चाहते नव्हते असा दावा केला आहे. केवळ मोफत जेवण आणि दारुसाठी या लोकांना गोळा करण्यात आला होतं, असं सिद्धार्थ म्हणाला आहे. अल्लू अर्जूनवर प्रेम असल्याने किंवा चित्रपटाबद्दल उत्सुकता असल्याने हे लोक गोळा झालेले नव्हते असंही सिद्धार्थने म्हटलंय.
आपल्या देशामध्ये जेसीबीने खोदकाम सुरु असतं त्या ठिकाणीही गर्दी गोळा होतो. बिहारमध्ये अल्लू अर्जूनला पाहण्यासाठी लोकांनी केलेल्या गर्दीचं मला काही विशेष वाटत नाही. त्यांनी नीट नियोजन केलं असेल तर गर्दी होणारच होती. भारतामध्ये गर्दीमध्ये दर्जा असं म्हणता येणार नाही. असं असेल तर सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुका जिंकल्या पाहिजेत. ही गर्दी बिर्याणीची पाकिटं आणि क्वाटरच्या बाटलीसाठी झाली,” असा टोला सिद्धार्थने लगावला आहे.
SHOCKING: Siddharth compares Pushpa 2 patna event with crowd which comes to watch JCB construction pic.twitter.com/BMyVUo3sWa
— Manobala Vijayabalan (@ManobalaV) December 10, 2024
सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणात यावरुन सिद्धार्थवर टीका केली जात आहे. अनेकांनी सिदार्थचं मत पटल्याचं म्हटलं आहे. तर बऱ्याच जणांनी त्याच्यावर थेट निशाणा साधला आहे. एकाने तर सिद्धार्थला उत्तरेत कोणी ओळखतही नाही. त्यामुळेच तो अल्लू अर्जूनवर जळतोय, असा टोला लगावला आहे. आपल्याच क्षेत्रातील व्यक्तीबद्दल असं विधान करणं अपमानकारक असल्याचं अन्य एकाने सिद्धार्थला सुनावताना म्हटलं आहे. तुम्हीच पाहा या कमेंट
अल्लू अर्जुन, रश्मिका मंदान्ना, फहाद फाजिल यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘पुष्पा 2: द रुल’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. ‘पुष्पा 2: द रुल’ हा 2024 मधील सर्वात मोठा चित्रपट ठरला आहे. यंदाचं वर्ष गाजवणाऱ्या ‘स्री-2’ने जितकी एकंदर कमाई केली आहे तो आकडा ‘पुष्पा 2: द रुल’ने अवघ्या पाच दिवसांमध्ये गाठला आहे. ‘पुष्पा 2: द रुल’ चित्रपटाच्या कमाईमध्ये दिवसोंदिवस वाढ होताना दिसत आहे. सध्या ‘पुष्पा 2: द रुल’ चित्रपट पाहण्यासाठी चाहते मोठ्या प्रमाणात थिएटरमध्ये गर्दी करत आहेत. ‘पुष्पा 2: द रुल’ चित्रपटाने आतापर्यंत 900 कोटींच्या आसपास कमाई केली आहे.
हेही वाचा :
“मोठी बातमी: खातेवाटपाचा निर्णय दिल्लीतच ठरणार? फडणवीस, शिंदे आणि अजित पवार दिल्लीला रवाना”
2019 पेक्षा मोठा राजकीय भूकंप? महाराष्ट्रात लवकरच मविआ आणि भाजपा
एकनाथ शिंदेंकडे 13 मंत्रिपदे: फडणवीसांचा फोनवरून सहभाग