महाराष्ट्रातील प्रसिद्ध रीलस्टारची बापाकडून हत्या

जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. एका माजी सैनिकाने आपल्या रीलस्टार (reel star)मुलाची हत्या करून नंतर आत्महत्या केली. मुलाच्या छळाला कंटाळून हे टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे.

विठ्ठल पाटील यांचा मृतदेह गुरुवारी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला(reel star). पोलिसांना त्यांच्या खिशात एक सुसाईड नोट सापडली, ज्यामध्ये त्यांनी मुलाची हत्या केल्याची कबुली दिली. तसेच मुलाचा मृतदेह कुठे आहे, याची माहितीही त्यांनी चिठ्ठीत दिली होती. मुलगा दारू पिऊन छळ करत असल्याने आपण त्याला संपवल्याचे त्यांनी चिठ्ठीत नमूद केले.

विठ्ठल पाटील हे मूळचे एरंडोल तालुक्यातील भवरखेड येथील रहिवासी होते, परंतु ते एरंडोल येथील वृंदावन नगर परिसरात कुटुंबासह राहत होते. त्यांचा मुलगा हितेश हा रीलस्टार होता आणि सोशल मीडियावर विविध विषयांवर रील्स बनवायचा. तो वडिलांपासून वेगळा राहत होता.

हितेशला दारूचे व्यसन होते आणि दारू प्यायल्यानंतर तो अनेकदा वडिलांच्या घरी जाऊन त्यांना मारहाण करत असे, अशी माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

हेही वाचा :

‘महिलेच्या गालाला, शरिराला हात लावणं म्हणजे…’; न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय

भारतीय संघ अडचणीत, न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडियाचा कर्णधार बदलणार? 

राणीसारखं आयुष्य जगतेय प्रियांका चोप्रा; संपत्तीचा आकडा ऐकून थक्क व्हाल