प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याचे कर्करोगाने निधन, पत्नी आणि मुलींवर कोसळला दुःखाचा डोंगर!

तमिळ चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध टीव्ही अभिनेता युवनराज नेथरुन यांचे निधन झाले. या अभिनेत्याला कर्करोगामुळे(cancer) आपला जीव गमवावा लागला. गेल्या सहा महिन्यांपासून ते गंभीर आजाराने त्रस्त होते. त्याच्यावर उपचार सुरू होते. परंतु अचानक अभिनेत्याने जगाचा निरोप घेतला आहे. काय आहे हे संपूर्ण प्रकरणजाणून घेऊयात.

लोकप्रिय टीव्ही अभिनेता युवनराज नेथरुण यांचे निधन झाले आहे. गेल्या सहा महिन्यांपासून ते कर्करोगाशी(cancer) झुंज देत होते, तसेच अभिनेत्यावर उपचार देखील सुरु होते. असे असून सुद्धा ते आजाराशी लढू शकले नाहीत. त्यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबात शोककळा तर पसरली आहेच पण टीव्ही इंडस्ट्रीतही निराशेचे वातावरण आहे. नेथरुन यांची पत्नी अभिनेत्री दीपिका मुरुगन आणि त्यांच्या दोन मुली अबेनाया आणि आंचना यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या अंत्यसंस्काराशी संबंधित माहिती अद्याप समोर आलेली नाही.

टीव्ही जगतात नेत्रुन म्हणून प्रसिद्ध असलेल्या युवनराजने अनेक प्रकारच्या पात्रांमध्ये अभिनय केला होता आणि तो त्याच्या दमदार अभिनयासाठी ओळखला जात होता. ‘मरुधानी’सारख्या टीव्ही मालिकेने त्यांनी खास ओळख निर्माण केली होती. सुरुवातीला अभिनेता प्रामुख्याने नकारात्मक भूमिकांमध्ये दिसला, परंतु या भूमिकांमध्येही त्यांच्या प्रतिभेचे कौतुक झाले.

नेथरुन यांची कारकीर्द अनेक रिॲलिटी शोजशीही जोडली गेली, जिथे त्याने आपली खास ओळख निर्माण केली. अभिनेत्याने विजय टेलिव्हिजनच्या ‘जोडी नंबर 1’ सीझन 3 आणि 5 मध्ये भाग घेतला होता.

याशिवाय त्यांनी सुहानी टीव्हीच्या ‘मस्ताना मस्ताना’ या डान्स रिॲलिटी शोमध्येही भाग घेतला होता, जिथे ते पहिले आले होते. तसेच त्यांनी ‘मी अँड मिसेस चिन्नाथिराय किल्लाडी’ आणि ‘सुपर कुडुंबम’ सारख्या इतर शोमध्येही आपली उपस्थिती दर्शवली.

नेथरुन यांची पत्नी दीपिका मुरुगन देखील लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री आहे. दोघांनी अनेक शोमध्ये एकत्र काम केले. सध्या दीपिका ZEE5 वर दाखवल्या जाणाऱ्या ‘निनाताले इनिक्कम’ या लोकप्रिय मालिकेत काम करत आहे.

नेथरुन यांची मुलगी अबेनाया हिनेही टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे, तर त्यांची दुसरी मुलगी आंचना हिला अलीकडेच एका तामिळ चित्रपटात मुख्य अभिनेत्री म्हणून साइन केले आहे. छोट्या पडद्यावरच नव्हे तर मोठ्या पडद्यावरही आपला ठसा उमटवण्यात हे कुटुंब यशस्वी ठरले आहे.

नेथरुन यांचा शेवटचा टीव्ही प्रोजेक्ट ‘पोन्नी’ आणि ‘बाकियालक्ष्मी’ होता, जिथे त्यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. त्यांच्या निधनाने टीव्ही इंडस्ट्रीचे मोठे नुकसान झाले आहे आणि त्यांचे चाहते आता त्यांच्या पात्रांद्वारे त्यांची आठवण ठेवतील. त्यांच्या निधनाने टीव्ही इंडस्ट्रीला मोठा धक्का बसला आहे.

हेही वाचा :

स्वप्नील जोशी पुन्हा एकदा पडला प्रेमात, अभिनेत्याच्या आयुष्यात झाली ‘तिची’ एंट्री?

महायुतीच्या शपथविधीसाठी उद्धव-राज ठाकरेंसह शरद पवारांनाही आमंत्रण

नको काँग्रेस, नको राष्ट्रवादी, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा ‘एकला चलो रे’चा नारा?