चाहत्यांना विनंती आहे की सामन्यानंतर… राजस्थानच्या मॅचनंतर धोनी निवृत्ती घेणार?

चेन्नई सुपर किंग्ज(chennai super kings fan) आणि राजस्तान रॉयल्स यांच्यातील रविवारच्या सामन्याची जबरदस्त क्रेज आहे. कारण हा महेंद्रसिंह धोनीचा चेन्नईवरील शेवटचा सामना असू शकतो. त्यामुळे चेन्नईच्या फॅन्स चेपॉक स्टेडियमवर गर्दी केली आहे.

दरम्यान, सामना सुरू होण्यास काही अवधी असतानाच चेन्नई सुपर किंग्जने(chennai super kings fan) आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवरून एक गुढ पोस्ट केली. या पोस्टमुळे राजस्थानविरूद्धच्या सामन्यानंतर धोनी निवृत्ती घेणार का अशी चर्चा सुरू झाली आहे.

सीएसकेने पोस्ट केली की, ‘सर्व चाहत्यांना सामन्यानंतर थांबण्याची विनंती करण्यात येत आहे. तुमच्यासाठी काही खास होणार आहे.’ या पोस्टनंतर धोनी निवृत्ती घेणार का अशी चर्चा सीएसकेचेच नाही तर सर्व भारतीय क्रिकेट चाहते करत आहेत.

सीएसके चाहत्यांसाठी पुढेच तीन ते चार तास हे खूप महत्वाचे असणार आहेत. धोनी आणि सीएसकेचे चाहते चेपॉकवरून काय जाहीर केलं जातं याचा विचार करत नखं कुरतडत बसले आहेत. चाहत्यांना आशा आहे की मी अजून एक वर्ष खेळणार असं धोनी सामन्यानंतर सांगेल.

महेंद्रसिंह धोनीने 2008 पासून आतापर्यंत चेन्नईकडून 262 सामने खेळले आहेत. पहिल्या हंगामातच धोनीने सीएसके जॉईन केलं होतं. त्यानं सीएसकेकडून आतापर्यंत 5218 धावा केल्या आहेत. त्याची सरासरी 39 असून त्यात 24 अर्धशतकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे त्याने सीएसकेला पाच आयपीएल टायटल जिंकून दिले आहेत.

हेही वाचा :

कोल्हापुरात खळबळ! दारूच्या नशेत तरूणाने केली मित्राची हत्या

‘मी यापुढे निवडणूक लढणार नाही’, एकनाथ खडसेंची मोठी घोषणा

इचलकरंजीतल हॉटेल मालकाच्या फसवणूक प्रकरणी संशयित आरोपींना अटक