चाहत्यांना धक्का, सोनाक्षी सिन्हाने लग्नाच्या 2 महिन्यातच घेतला मोठा निर्णय

बॉलीवुड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांच्या लग्नाला (marriage)आता जवळपास 2 महीने झाले आहेत.गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट केल्यानंतर या स्टार कपलने एकदम खासगी पद्धतीने लग्नाची नोंदणी केली.अशात सोनाक्षीने लग्नाच्या दोनच महिन्यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

सोनाक्षी सिन्हा 23 जून 2024 रोजी तिचा बॉयफ्रेंड झहीर इक्बालसोबत विवाह(marriage) बंधनात अडकली होती. तिने मुंबईतील तिच्या अपार्टमेंटमध्ये लग्न केलं. ज्या घरात तिनं लग्न केले त्या घराबाबत आता सोनाक्षी सिन्हाने महत्त्वाचा निर्णय घेतलाय.

काही मीडिया रिपोर्टनुसार, सोनाक्षीचा हा आलिशान अपार्टमेंट विक्रीसाठी आहे. एका इंस्टाग्राम अकाउंटवर सोनाक्षीच्या घराचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये घराची किंमत देखील सांगण्यात आली आहे. ‘एक आलिशान समुद्राभिमुख घर’ असा या पोस्टमध्ये उल्लेख करण्यात आला आहे. हे घर 4200 चौरस फूट सुपर एक्सपेंसिव्ह सी-फेसिंग अपार्टमेंट आहे. जे पूर्वी 4 BHK होते.

ज्या घरात सोनाक्षीने लग्न केलं ते घर अभिनेत्रीने विकण्याचा निर्णय घेतला आहे. या बातमीमुळे चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे. ही जागा 25 कोटींना विक्रीसाठी ठेवण्यात आली आहे. याबाबत सोनाक्षीने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. मात्र, तिने ही पोस्ट लाइक केली आहे.

या पोस्टवर आता नेटकरी विविध प्रश्न करत आहेत. सोनाक्षी अपार्टमेंट विकण्याचा ‘हताश’ प्रयत्न करत आहे, असं एका व्यक्तीने म्हटलंय. तर एका युजरने म्हटले की, इतक्या लवकर का? अन्य एका यूजरने लिहिले की, “सोनाक्षी सिन्हा गेल्या काही वर्षांपासून हे अपार्टमेंट विकण्यासाठी बेताब आहे.”

दरम्यान, सोनाक्षी आणि झहीर दोघेही आपलं वैवाहिक आयुष्य सुखी जगत आहेत. दोघेही लग्नानंतर विदेशात फिरायला गेले होते. आता दोघेही सोबत स्पॉट होतात. त्यांचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

हेही वाचा:

आज कोल्हापूर बंदची हाक…

जेथे अशी मानसिकता असते तेथे “व्यवस्था” नांदत नसते!

बदलापूरात शाळेतील घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्रातल्या लेकी बाळींसाठी उद्या महाराष्ट्र बंद