ग्रजीपेक्षा सर्वसामान्य, शेतकऱयांचे प्रश्न महत्त्वाचे!

माझ्याबरोबर फाडफाड इंग्रजीची स्पर्धा लावा. तुम्ही जिंकलात तर मी लोकसभेचा (strange)अर्ज भरणार नाही, असे अजब आव्हान देणाऱया सुजय विखे-पाटील यांना सामाजिक भान जपत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या नीलेश लंके यांनी प्रत्येकाला आपल्या मातृभाषेचा अभिमान हवा.

संसदेत खासदाराला आपल्या भाषेतून बोलता येते. तुम्ही कोणत्या भाषेत (strange)बोलता यापेक्षा सर्वसामान्य आणि शेतकऱयांचे प्रश्न सोडवणे जास्त महत्त्वाचे असल्याचे सांगत प्रत्युत्तर दिले आहे.

लोकसभा निवडणूक प्रचारा वेळी सर्वसामान्यांना भेडसावणाऱया समस्या, प्रश्न, सोयीसुविधा, लोकांसाठी विकासकामे काय करणार, हे मांडण्याऐवजी आता एकमेकांवर व्यक्तिगत कुरघोडी करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. खासदारकी ही केवळ इंग्रजी बोलणाऱयांची जहागिरी असल्याच्या तोऱयात सुजय विखे-पाटील यांनी लंके यांना आव्हान दिले. नगरमध्ये माझी इंग्रजी तुझ्यापेक्षा चांगली आहे. त्यामुळे तुम्ही खासदार होऊ शकत नाही. खासदार मीच होणार आणि तुम्हाला खासदार व्हायचे असेल तर पहिल्यांदा माझ्याशी इंग्रजीतून भाषणाची स्पर्धा लावा. ती जिंकलात तर मग मीच खासदारकीचा अर्ज भरणार नाही, असे अजब आव्हान लंके यांना भर प्रचाससभेत दिले होते.

दोन्ही उमेदवार डॉक्टर
डॉ. सुजय विखे-पाटील न्युरोसर्जन आहेत. काही काळ त्यांनी प्रॅक्टीसही केली, तर डॉ. नीलेश लंके यांचे बारावीपर्यंत शिक्षण झाले असून त्यानंतर त्यांनी आयटीआय अभ्यासक्रम केला आहे. अलीकडेच त्यांनी मुक्त विद्यापीठातून बीएची पदवी घेतली असून एका संस्थेने त्यांना मानद डॉक्टरेट प्रदान केली आहे. लंके यांचे समर्थक त्यांचा डॉक्टर असा उल्लेख करतात.

हेही वाचा :

काजोलने बर्थडेलाच अजय देवगनला मारला टोमणा; मजेशीर पोस्ट पाहून…

शिवसेनेची मशाल हाती घेण्यास शेट्टींचा नकार

‘तू आधी इथून निघ’, लेक रिद्धिमाच्या लग्नात सलमानवर संतापले ऋषी कपूर,