राज्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे(onion) दर वाढले आहेत. मात्र आता उन्हाळी कांदा जवळपास संपला असल्याने नाशिक जिल्ह्यातील विविध बाजार समित्यांमध्ये जुना लाल कांद्याची आवक कमी झाल्याचं दिसत आहे. मात्र आता लासलगाव मुख्य बाजार आवारासह उपबाजार निफाड व विंचूर येथे डिसेंबर महिना सुरु झाल्यापासून तब्बल 3 लाख क्विंटल नवीन लाल कांद्याची आवक झाली आहे.
![](https://smartichi.com/wp-content/uploads/2024/12/image-181.png)
कारण लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याची आवक संपुष्टात आल्याचं दिसत आहे. त्यामुळे नवीन लाल कांद्याची(onion) आवक दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर बाजारात येत आहे. त्यामुळे आता बाजारसमित्यांमध्ये लाल कांदा मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी दाखल होत असल्याने दरात देखील घसरण होत आहे.
मात्र या लाल कांद्याला जास्तीत जास्त 5 हजार 641 रुपये, तर कमीतकमी 1 हजार रुपये तर सरासरी 3 हजार 600 रुपये इतका प्रतिक्विंटलला बाजारभाव मिळाला आहे. तसेच नाशिक जिल्ह्यातील लासलगाव बाजारसमितीमधून कांद्याचे कंटेनर नुकताच श्रीलंकेसाठी रवाना झाला आहे. त्यामुळे आता लाल कांद्याची आवक वाढल्यामुळे निर्यात शुल्क तब्बल 20 टक्के रद्द केल्यास परदेशात भारतीय कांद्याला देखील चांगली मागणी मिळू शकते अशी अपेक्षा शेतकऱ्यांना असल्याचं दिसत आहे.
सध्या लाल कांद्याची आवक वाढल्याने दर कांद्याचे दर स्थिर राहण्यासाठी कांदा निर्यातीवरील 20 टक्के निर्यातशुल्क रद्द करावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. तसेच यासाठी केंद्र सरकारकडे लोकप्रतिनिधींनी देखील लवकरात लवकर पाठपुरावा करावा अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.
याशिवाय लासलगाव बाजार समितीकडून देखील केंद्र सरकारकडे याबाबत पाठपुरावा सुरू केल्याचे लासलगाव बाजार समितीचे सचिव नरेंद्र वाढवणे यांनी सांगितले आहे.
हेही वाचा :
CSMT जवळ बेस्ट बसने एकाला चिरडलं; जागीच मृत्यू
‘पुष्पा 2’ सुरू असतानाच चित्रपटगृहात तरुणाचा मृतदेह, तरीही सुरूच होता सिनेमा…
पवार एकत्र आले, शिंदेंची गरज संपेल… कशी?; अजित पवार-शरद पवार भेटीमागचे नेमके संकेत काय?