शेतकऱ्यांनो लक्ष द्या! वारस नोंदणीत बदल होणार

राज्यातील शेतकऱ्यांच्या वारसांना त्यांच्या हक्काची जमीन(decision) मिळावी यासाठी सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. महसूल विभागाने मृत शेतकऱ्यांच्या जमिनीच्या कायदेशीर वारसांची नोंदणी सातबारा उताऱ्यावर करण्यासाठी विशेष मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला आहे.

वारसांना मिळणार जमीन हक्क:
राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या वारसांसाठी मोठा निर्णय घेतला असून, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी वारस नोंदणी प्रक्रियेची गती वाढवण्याचे निर्देश दिले आहेत. महसूल विभागाच्या या निर्णयामुळे अनेक शेतकरी कुटुंबांना त्यांच्या हक्काची जमीन मिळणार आहे.सध्या बुलढाणा जिल्ह्यात प्रायोगिक तत्वावर ही मोहीम सुरू असून, त्यानंतर ती टप्प्याटप्प्याने संपूर्ण महाराष्ट्रात लागू केली जाणार आहे.(decision) यासाठी निश्चित वेळापत्रक आखले जात असून, संपूर्ण राज्यभर मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी केली जाईल.

शेतकऱ्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या जमिनींच्या मालकीसंदर्भात वारसांमध्ये अनेकदा वाद निर्माण होतात. अनेक जमिनी निष्क्रिय राहतात, आणि वारसांना सरकारी योजनांचा लाभ मिळू शकत नाही. महसूल विभागाच्या १०० दिवसांच्या कृती आराखड्यात या मोहिमेला स्थान देण्यात आले असून, यामुळे संपूर्ण राज्यातील सातबारा उतारे अद्ययावत होतील.वारस नोंदणीमुळे लाभार्थी शेतकऱ्यांना विविध कृषी योजना, अनुदाने आणि पतपुरवठा मिळवणे सुलभ होईल. तसेच, जमिनीच्या मालकीचा प्रश्न सुटल्याने भविष्यात वारसदारांमध्ये होणाऱ्या (decision) वादांना आळा बसणार आहे.

वारस नोंदणी प्रक्रिया कशी होईल? :
– प्रत्येक गावातील तलाठी मृत खातेदारांची यादी तयार करतील.
– वारसांना तलाठ्याकडे आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतील, जसे की:
अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र
– सर्व वारसांचे वय दर्शवणारा दस्तऐवज
– आधार कार्डाची सत्यप्रत
– विहित नमुन्यातील स्वयंघोषणापत्र किंवा शपथपत्र
– अर्जदाराचा पत्ता आणि मोबाइल क्रमांक त्यानंतर तलाठ्यांमार्फत चौकशी होऊन मंडळाधिकाऱ्यांकडून वारस नोंदणीचा प्रस्ताव मंजूर केला जाईल. मंडळाधिकारी सातबारा उताऱ्यात आवश्यक दुरुस्ती करून वारसांची नोंद करतील. तहसीलदारांना या मोहिमेचे समन्वयक म्हणून जबाबदारी देण्यात येईल.

वारस नोंदणीसाठी अर्ज केवळ ‘ई-हक्क प्रणाली’द्वारे स्वीकारले जातील. या मोहिमेचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे दर आठवड्याला पाठवण्यात येईल, जेणेकरून संपूर्ण प्रक्रियेवर नियंत्रण ठेवता येईल.

हेही वाचा :

तरुणाची निर्घृण हत्या; शरीराचे तुकडे वेगवेगळ्या विहिरीत सापडले

बारामतीत पुन्हा एकदा काका विरूद्ध पुतण्या? युगेंद्र पवार घेणार मोठा निर्णय!

सूरज चव्हाणच्या ‘झापूक झुपूक’ची पहिली झलक; ‘एका बुक्कीत टेंगुळ’ डायलॉगने घातला धुमाकूळ!

मासा खात असाल तर सावधान! हा धोकादायक आजार होऊ शकतो

रोहित शर्मावर संघ व्यवस्थापन नाराज; IPL 2025 नंतर कर्णधारपदाबाबत मोठा निर्णय घेणार..