बीड पोलिसातील “फासले”

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीड पोलिसांची(Police), तेथील जिल्हा प्रशासनाची, आणि धनंजय मुंडे यांचा उजवा हात असलेल्या वाल्मीक कराड याची काळी बाजू अधिक गडद होऊन पुढे आली. बीड मधील एकेक प्रकरणे पुढे येऊ लागल्यानंतर “मिर्झापूर” सारखी वेब सिरीज कमालीची सौम्य आणि मवाळ वाटू लागते. आता याच जिल्ह्यातील एक साधा फौजदार”सिंघम”असल्याच्या अविर्भावात मीडियाच्या समोर आलेला आहे. रणजीत फासले नामक निलंबित फौजदाराने इलेक्ट्रॉनिक मीडिया, सोशल मीडिया आणि प्रिंट मीडियात गेल्या दोन दिवसापासून तळ ठोकला आहे. खळबळ जनक बातम्यांच्या शोधात असलेल्या मीडियाला हे फासले महाशय भेटले आहेत.

बीड पोलीस(Police) दलात सायबर शाखेकडे काम करणारे हे रणजीत फासले सध्या निलंबित आहेत. पूर्वपरवानगीशिवाय परराज्यात जाऊन एका व्यापाऱ्याकडे खंडणी मागितल्याच्या आरोपावरून त्यांना निलंबित करण्यात आले आहे. वाल्मीक कराड याचा एन्काऊंटर करण्याची काही कोटी रुपयांची ऑफर (सुपारी) मला आली होती असा दावा करून त्यांनी सोमवारी खळबळ उडवून दिली होती आणि मंगळवारी त्यांनी या ऑफर प्रकरणात माजी मंत्री धनंजय मुंडे यांचेच नाव घेऊन सनसनाटी निर्माण केली. अशा प्रकारची आपणाला ऑफर आली होती याबद्दलची त्यांनी म्हणे स्टेशनला एन्ट्री सुद्धा केली होती.

जवळच्या पोलीस ठाण्यात जाऊन तेथील स्टेशन डायरेक्ट त्यांना एंट्री करण्याचा मुळात अधिकार नाही. त्यांनी याबद्दल जवळच्या पोलिथान्यात रीतसर फिर्याद देणे आवश्यक होते पण तसे त्यांनी केले नाही. आपण कोणत्या पोलीस ठाण्यात त्याबद्दलची एन्ट्री केली होती त्या पोलिओ ठाण्याचे नाव मात्र त्यांनी सांगितलेले नाही. वास्तविक अशा प्रकारची स्टेशन डायरीत एंट्री जिल्ह्यातील कोणत्याही पोलीस ठाण्यात झालेली नाही त्याचा खुलासा बीड पोलीस प्रशासनाने तातडीने करायला हवा होता. मात्र तसा त्यांनी खुलासा न केल्यामुळे या एन्ट्री चे गुढ वाढले आहे.

गृह खात्याची जबाबदारी असलेले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सुविद्य पत्नी अमृता फडणवीस यांच्यावरही या फासले महाशयाने बिन बुडाचे गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या वर भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्या या फासलेवर कायदेशीर कारवाई का होत नाही असा सवाल उपस्थित केला जातो आहे. कदाचित एका साध्या फौजदाराने केलेल्या आरोपाला उत्तर देऊन त्याला उगाच मोठे कशाला करायचे हा सुद्धा त्यामागे विचार असू शकतो.

रणजीत फासले या निलंबित फौजदाराने खळबळजनक दावे केल्यानंतर बीड पोलिसांनी(Police) त्याला तातडीने ताब्यात घेऊन या एन्काऊंटर प्रकरणाची चौकशी केली पाहिजे. फासले याच्या दाव्यानंतर त्याचे पडसाद राजकारणात उमटले आहेत.

वाल्मीक कराड याला तुरुंगात मारले जाऊ शकते असे संजय राऊत यांनी म्हटले आहे तर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती अंजली दमानिया यांनी फासले हा केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी बोलत आहे. त्याच्या वक्तव्याला फार महत्त्व द्यावे असे नाही असे म्हटले आहे. बीडचे जिल्हा पोलीस प्रमुख नवनीत कावत यांनी एका निलंबित फौजदाराबद्दल मला काही बोलायचे नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे.

रणजीत फासले याने तथाकथित एन्काऊंटर ऑफर प्रकरणात माजी मंत्री धनंजय मुंडे यांना आणले आहे. वाल्मीक कराड हा जिवंत राहिला तर आपण अडचणीत येऊ अशी भीती त्यांना वाटते आहे आणि म्हणूनच वाल्मिक कराडचे एन्काऊंटर त्यांना हवे आहे असा खुलासाही फासले महाशयाने केला आहे.

रणजीत फासले याच्या तथाकथित दाव्यावर विश्वास ठेवावा असे नाही. तथापि वाल्मीक कराड याचा अशाच प्रकारे मृत्यू झाला तर त्याची तयारी म्हणून ही एन्काऊंटरची पार्श्वभूमी मुद्दाम तयार करण्यात आलेली नाही ना? अशीही चर्चा सुरू झाली आहे. फासले याला चौकशीसाठी ताब्यात घेतले तरच यातील सत्य बाहेर येणार आहे.

हेही वाचा :

नीना गुप्ता यांनी स्वतःच्या ब्रेस्टबद्दल केली अशी कमेंट, लोकांनी कान बंद केले

कुस्तीविश्वात खळबळ! शिवराज राक्षेला न्याय, कुस्ती महासंघाने घेतला मोठा निर्णय

युजवेंद्र चहल ठरला केकेआरविरुद्ध जायंट किलर, प्रीती झिंटाने मारली ‘आनंदाची मिठी’, व्हिडिओ व्हायरल