प्रियकराकडून लेकीचे ३५ तुकडे, हत्येनं खचलेल्या वडिलांचं निधन; ‘ती’ अखेरची इच्छा राहिली अधुरी

१८ मे २०२२, संपूर्ण देशाला हादरवून टाकणारी घटना घडली होती. २७ वर्षीय श्रद्धा वालकरची तिच्या प्रियकराने अतिशय विकृत पद्धतीने हत्या(murdered) केली होती. घटनेचं वृत्त ऐकून श्रद्धाच्या कुटुंबाला धक्का बसला होता. दरम्यान मुलीच्या हत्येने खचलेल्या विकास वालकर यांचं मुंबईत हृदय विकाराच्या झटक्यानं निधन झालं.दिल्लीच्या महरोली परिसरातील घरात श्रद्धाचा प्रियकर आणि लिव्ह इन पार्टनर आफताब अमीन पुनावालानं तिची हत्या केली होती.

मुलीच्या हत्येनंतर विकास वालकर यांना मानसिक धक्का बसला होता. मुलीच्या मृतदेहाच्या(murdered) अवशेषांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी त्यांची प्रतीक्षा सुरु होती. पण श्रद्धाच्या मृतदेहांचे अवशेष पोलीस तपासातील पुरावा असल्याने विकास वालकर यांना अवशेष मिळाले नाहीत. त्यामुळे मुलीच्या मृतदेहाच्या अवशेषांवर अंत्यसंस्कार करण्याची त्यांची इच्छा अधुरीच राहिली. श्रद्धाच्या हत्येचा उलगडा तब्बल ६ महिन्यांनंतर झाला.

आफताबने तिची हत्या मृतदेहाचे तुकडे करून फ्रिजमध्ये ठेवले आणि नंतर पोलिसांना चकमा देण्यासाठी तो अनेक दिवस दिल्लीच्या वेगवेगळ्या भागात मृतदेहाचे तुकडे फेकत राहिला. नंतर जंगलातून काही शरीराचे अवयव सापडले. नोव्हेंबर २०२४ मध्ये, दिल्लीच्या तिहार तुरुंग अधिकाऱ्यांनी आरोपी आफताब पूनावालाला लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून धमक्या मिळाल्यानंतर त्याच्या सुरक्षेची स्थिती तपासली.

चौकशीदरम्यान, सिद्दीकी हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी शिवकुमार गौतम उर्फ ​​शिवाने खुलासा केला की, बिश्नोई टोळीचा सदस्य शुभम लोणकरने आफताब पूनावालावर हल्ला करण्याचा कट रचला होता. तथापि, कडक सुरक्षेमुळे टोळीने त्याच्यावर हल्ला न करण्याचा निर्णय घेतला. श्रद्धा आणि पूनावाला लग्न करण्यापूर्वी तीन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते.

श्रद्धाच्या कुटुंबाला हे नातं मान्य नव्हतं. २०१९ मध्ये जेव्हा कुटुंबाने श्रद्धाच्या लिव्ह-इन रिलेशनशिपच्या निर्णयाला विरोध केला तेव्हा तिने सांगितले की ती २५ वर्षांची आहे आणि स्वतःचे निर्णय स्वतः घेण्यास सक्षम आहे. तिने तिच्या वडिलांना ती आता त्यांची मुलगी नाही हे मान्य करण्यास सांगितले. श्रद्धा २८ वर्षीय आरोपी पूनावालासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होती. दोघेही प्रथम वसईमध्ये भाड्याच्या घरात राहत होते आणि तेथून दिल्लीला गेले, जिथे श्रद्धाची आरोपींनी हत्या केली.

हेही वाचा :

सरकारी नोकरीची मोठी संधी, रेल्वेत हजारो पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु

लग्नाची तारीख ठरली, वधूही तयार झाली… पण ‘या’ क्रिकेटपटूने संघासाठी केला मोठा त्याग

धक्कादायक! शाळेची फी मागितल्याच्या रागातून वडिलांनी केली सहा वर्षाच्या मुलाची हत्या