बाप की हैवान? पोटच्या १६ वर्षीय मुलीवर वर्षभरापासून अत्याचार; गरोदर झाल्यावर…

कर्नाटकमधील गडग जिल्ह्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मुलांगड पोलीस स्टेशनच्या हद्दीत ५१ वर्षीय नराधम बापाने(Father) आपल्या १६ वर्षीय पोटच्या लेकीवर वर्षभर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. मुलगी गरोदर राहिल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून पोलिसांनी आरोपी बापाला अटक केली आहे.

प्राप्त माहितीनुसार, पीडित मुलीच्या पायाला सूज आल्याने तिला रुग्णालयात नेण्यात आले. तेथे स्कॅनिंग आणि रक्त तपासणीदरम्यान डॉक्टरांनी मुलीच्या आईला मुलगी ३१ आठवड्यांची गरोदर असल्याचे सांगितले. यानंतर आईने मुलीला विचारले असता तिने आपल्या वडिलांनी(Father) वारंवार अत्याचार केल्याचा खुलासा केला. पीडितेच्या सांगण्यानुसार, मागील वर्षभर वडील घरात कोणी नसताना तिच्यावर अत्याचार करत होते आणि हा प्रकार कोणाला सांगितल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी देत होते.

मुलीच्या आईने तातडीने मुलांगड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. पोलिसांनी भारतीय दंड संहिता आणि पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवून मंगळवारी आरोपी बापाला अटक केली. पोलीस पुढील तपास करत असून पीडित मुलीचे समुपदेशन करण्यात आले आहे. वैद्यकीय तपासणीनंतर पुढील कारवाई केली जाणार आहे.

या कुटुंबावर मोठा आघात झाला असून पीडित मुलीला एक मोठी बहीण आहे जी रुग्णालयात नर्स म्हणून काम करते, तर तिचा लहान भाऊ पाचवीत शिक्षण घेत आहे. या अमानुष कृत्यामुळे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे. समाजात अशा घटनांवर कठोर कारवाई होण्यासाठी पोलिसांनी तातडीने न्याय द्यावा, अशी मागणी होत आहे.

हेही वाचा :

‘या’ अभिनेत्रीने नाकारली ६०० कोटींची संपत्ती; लग्नापूर्वी झाली ३४ मुलांची आई

‘या’ अभिनेत्रीने नाकारली ६०० कोटींची संपत्ती; लग्नापूर्वी झाली ३४ मुलांची आई

MPSC मुख्य परीक्षा पुढे ढकलणार? उमेदवारांनी केली मोठी मागणी