कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? हा प्रश्न उपस्थित करून उबाठा गटाच्या उद्धव ठाकरे, संजय राऊत(political correctness) यांनी चर्चेला तोंड फोडले होते पण महाविकास आघाडी हाच आमचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा आहे असा खुलासा करून शरद पवार यांनी चर्चेला पूर्ण विरामही दिला होता. आता त्यांनीच एका जाहीर कार्यक्रमात मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबद्दल सुचक वक्तव्य करून घटक पक्ष नेत्यांच्या गोटात भीती निर्माण केली आहे. या विधानसभा निवडणुकीत बहुमतासाठी लागणारी मॅजिक फिगर केवळ आपणच आणू शकतो असे आभासी वातावरणही त्यांनी आघाडी अंतर्गत तयार केले आहे.
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला(political correctness) दणदणीत यश मिळाल्यानंतर अर्थातच आघाडीचे संस्थापक म्हणून सर्व श्रेय त्यांच्याकडेच गेले होते. विधानसभा निवडणुकीतही त्यांचाच करिष्मा दिसणार हे गृहीत धरून अनेक राजकीय मंडळींची पाऊले त्यांच्या गटाकडे वळू लागली आहेत, वळली आहेत. त्यांच्याकडच्या वाढत्या इनकमिंग मुळे अर्थातच अजितदादा गटाचे आउटगोइंग वाढले आहे. पण माझ्याकडे ज्यांना उमेदवारी मिळणार नाही अशी मंडळीच तिकडे जात असल्याचा खुलासा अजितदादा यांना घाई गडबडीने करावा लागला.
जयंत पाटील यांच्या मतदार संघातील एका कार्यक्रमाला शरद पवार हे प्रमुख अतिथी होते. जयंत रावांना महाराष्ट्र घडवण्याची जबाबदारी घ्यावी लागणार, त्यांना ही जबाबदारी माझ्याकडूनच दिली जाणार असल्याचे शरद पवार यांनी तेथे बोलताना वक्तव्य केल्यानंतर महाविकास आघाडीत अस्वस्थता निर्माण झाली आहे. महाराष्ट्र घडवण्याची जबाबदारी याचा अर्थ मुख्यमंत्री पदाची जबाबदारी असा त्यांच्या वक्तव्याचा अर्थ होतो. हा आधीच दादा पवार यांनाही टोला असू शकतो. सध्या जयंत पाटील यांच्याकडे शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष पद आहे. तसे पहिले तर ही त्यांच्यावर आधीच सोपवलेली जबाबदारी आहे. त्यामुळे आणखी मोठी जबाबदारी मुख्यमंत्री पदाचीच असू शकते.
अर्थात आघाडीत सर्वाधिक जागा मिळाल्यानंतर च्या या गोष्टी आहेत पण आत्ताच सुचक वक्तव्य त्यांनी केले आहे. या वक्तव्यावरून काय प्रतिक्रिया येतात हे पाहण्याचा त्यामागे हेतू असू शकतो.महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण यावर चर्चा सुरू झाल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी आम्हाला मुख्यमंत्री पदांमध्ये इंटरेस्ट नाही असे सांगून टाकले होते. खुद्द जयंत पाटील यांनी तशाच प्रकारची प्रतिक्रिया दिली होती. शरद पवार यांनी तर आघाडी हाच आमचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असल्याचा खुलासा केला होता. त्यानंतर आता एकदम त्यांनी जयंत पाटील यांच्यावर महाराष्ट्र घडवण्याची जबाबदारी येणार असल्याचे सूचक वक्तव्य त्यांनी केले आहे.
इसवी सन 2019 मध्ये महाराष्ट्रात त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यानंतर, अगदी अचानक पणे राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित दादा पवार यांनी पक्षांतर्गत बंड करून देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत पहाटेचा शपथविधी उरकून घेतला होता. हे सरकार अवघ्या 82 तासात कोसळले. त्यानंतर आम्हाला सर्वसामान्य जनतेने विरोधी बाकावर बसण्याचा कौल दिलेला आहे असे मीडियासमोर शरद पवार हे सातत्याने सांगताना दिसले होते. आणि त्याचवेळी ते काँग्रेसच्या सोनिया गांधी यांच्याशी चर्चेच्या फेऱ्या करत होते. त्यांचे मन वळवल्यानंतर शरद पवार यांनी महा विकास आघाडी चा सारीपाट मांडला.
त्यांनी उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदी विराजमान केले आणि नाही नाही म्हणत स्वतःच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात सरकार आणले.
एकूणच महाराष्ट्राच्या राजकारणात(political correctness) शरद पवार यांची नेमकी भूमिका सर्वसामान्यांना कळत नाही. राजकीय विश्लेषकांनाही त्यांच्या राजकारणाचा थांग पत्ता लागत नाही. म्हणूनच त्याला शरद नीती असे म्हणतात. या नीतीने सध्या महाविकास आघाडीत अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
शरद पवार यांच्या गटाकडे हाताच्या बोटावर मोजता येतील इतके आमदार सध्या आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे जवळपास 40 पेक्षा अधिक जागा रिक्त आहेत. आणि म्हणूनच जास्तीत जास्त इच्छुकांना ते संधी देऊ शकतात. त्यामुळेच त्यांच्याकडे इनकमिंग वाढलेले आहे. त्याचा ते पुरेपूर राजकीय फायदा घेऊ शकतात. सर्वाधिक पसंती माझ्या गटाला असल्याचे ते आघाडीतील घटक पक्षांना अप्रत्यक्षपणे संदेश देताना दिसतात. आघाडी मध्ये सर्वाधिक जागा जिंकून आणायच्या आणि मग मुख्यमंत्रीपदावर दावा करायचा हे त्यांचे राजकीय सूत्र दिसते.
हेही वाचा:
कांद्याच्या दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारचा प्लॅन…
कोल्हापुरात अजूनही महाविकास आघाडीमध्ये घमासान सुरुच; या तीन जागांवर घोडं अडलं!
मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतली का? बच्चू कडू उत्तर देताना म्हणाले, ‘4 नोव्हेंबरला मोठा स्फोट होणार’