विमान प्रवासाची धास्ती वाढली, गुगलवर ‘फ्लाइट सेफ्टी’चा सर्वाधिक सर्च

या वर्षात काही मोठे विमान (plane)अपघात घडले. त्याचा परिणाम लोकांच्या मनावर आहे. लोक चिंतेत आहेत. त्यांना विमान प्रवासाची धास्ती वाटत आहे. त्यातूनच अमेरिकन लोकांनी फ्लाइट सेफ्टीसंदर्भात सर्वाधिक गुगल सर्च केल्याचे समजते.

गुगल ट्रेंड्सनुसार ऑक्टोबर 2014 नंतर अमेरिकन लोकांनी फ्लाइट(plane) सेफ्टीबद्दल सर्वाधिक वेळा सर्च केले. 2014 किंवा 2019 च्या तुलनेत या वर्षी अपघातांमध्ये कमी मृत्यू झाले आहेत. गेल्या वर्षी 37 लाख व्यावसायिक विमान उड्डाणांमध्ये एकही जीवघेणा अपघात झाला नाही. 2024 हे वर्ष सुरक्षिततेच्या दृष्टीने सरासरी राहिले आहे. तरीही लोकांना विमान प्रवासाचे टेन्शन वाटत आहे.
एनटीएसबी डेटा बेसनुसार पहिल्या तिमाहीत व्यावसायिक प्रवासी किंवा मालवाहू उड्डाणांसह 11 अपघात झाले. 2010 ते 2019 मधील सरासरी 9.7 पेक्षा हे किंचित जास्त आहे.


2 जानेवारी रोजी जपान एअरलाइन्सच्या विमानाची धावपट्टीवर जोरदार धडक बसल्यानंतर काही दिवसांनी बोइंग विमानाचा दरवाजा हवेत उडाला. या आठवडय़ात सिंगापूर एअरलाइन्सच्या विमानात एअर टर्ब्युलेन्स अपघात झाल्याची घटना घडली. अशा घटनांमुळे विमान प्रवास सुरक्षित आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

हेही वाचा :

ट्रकचालकाने दुचाकीचालकाला चिरडलं; संतप्त जमावाकडून ट्रकवर दगडफेक

निवडणुकीनंतर ठाकरे भाजपसोबत? शरद पवारांनी दिले हे उत्तर

 …तर माझ्यावरही गुन्हे दाखल करा; सांगलीत रोहीत पाटील यांनी पोलीस ठाण्यात मांडला ठिय्या