शरद पवार गटाची अंतिम यादी जाहीर; धनंजय मुंडेंविरुद्ध ‘हा’ नेता लढणार

येत्या 20 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी(political news todays) मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून तिसरी उमेदवार यादी जाहीर करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादीच्या तिसऱ्या यादीची घोषणा केली.

आता तिसऱ्या यादीत 9 जणांची उमेदवारी(political news todays) घोषित करण्यात आली आहे. या उमेदवारांमध्ये बीडमधील परळी मतदारसंघात धनंजय मुडेंच्या विरोधात राजेसाहेब देशमुख यांना उमेदवारी देण्यात आला आहे. तर मुंबईतील अणुशक्तीनगरमधून अभिनेत्री स्वरा भास्कर हिचे पती फहद अहमद यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून आतापर्यंत 76 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. यातील पहिल्या यादीत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या 45 उमेदवारांची नावाची घोषणा करण्यात आली होती.

दुसऱ्या यादीत 22 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर आता तिसऱ्या यादीत 9 जणांची उमेदवारी घोषित करण्यात आली आहे.

Sharad Pawar गटाची अंतिम यादी
१. करंजा – ज्ञायक पटणी

  1. हिंगणघाट – अतुल वांदिले
  2. हिंगणा – रमेश बंग
  3. अणुशक्तीनगर – फहाद अहमद
  4. चिंचवड – राहुल कलाटे
  5. भोसरी – अजित गव्हाणे
  6. माझलगाव – मोहन बाजीराव जगताप
  7. परळी – राजेसाहेब देशमुख
  8. मोहोळ – सिद्धी रमेश कदम

हेही वाचा :

भाजपमधील नेते करत आहेत शिंदे गटात प्रवेश

कोणी काहीही बोलू लागल वातावरण तापत चालल….!

जुनी दोस्ती विसरून अभिजितनं झाडली दयावर गोळी, CID मालिकेचा नवा प्रोमो समोर