सोशल मीडियावर कायम अनेक व्यक्तीचा पाण्यात बुडून मृत्यू झालेल्याच्या घटना समोर येत असतात. अनेकदा मृत्यू होण्याचे कारण व्यक्तीचा निष्काळजीपणा असतो तर कधी अचानक आलेल्या लाटेमुळे पाण्यात बुडतात. मात्र सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात पाण्यात बुडून जाणाऱ्या लेकीला तिच्या आईने वाचवले आहे. सध्या संपूर्ण घटनेचा थरार सोशल मीडियावर(video viral)व्हायरल होत आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला संपूर्ण एक समुद्रकिनारा दिसून येत आहे. ज्यात समुद्राच्या किनारी असंख्य पर्यटक समुद्राच्या पाण्यात खेळताना दिसत आहेत.मात्र यात काही वेळाने समुद्राच्या किनारी आई आणि एक मुलगी बसलेली असते मात्र समुद्राची लाट जोरात येते आणि दोघींनी समुद्रात ओढून घेऊन जाते. मात्र दोघीही काही वेळ त्या लाटेच वाहून जाताना दिसत आहे, मात्र व्हिडिओच्या शेवटपर्यंत पाहिले तर आईने स्वता:चा विचार न करता आपल्या लेकीला वाचवले आहे. सध्या सर्वत्र या व्हिडिओची (video viral)चर्चा होत आहे.
आई आणि मुलीचा संपर्ण व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया या प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत असून तो व्हिडिओ इन्स्टाग्रामवरील ”infoelovly” या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ कधीचा आहे आणि कुठला आहे हे समजू शकलेले नाही मात्र सध्या सर्वत्र या व्हिडिओची चर्चा होत आहे.
सध्या या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओला पाहिल्यानंतर अनेक नेटकरी वर्गातून प्रतिक्रिया आलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,” काय गरज होती” तर दुसऱ्या यूजरने लिहिले आहे की,”आई ती आईच असते” तर तिसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,”नशीब काही झाले नाही”, अशा अनेक हैराण करणाऱ्या तर अनेकांनी संतापजनक प्रतिक्रिया केलेल्या आहेत.
हेही वाचा :
एकनाथ शिंदेंचा हा माणूस पोलीस बंदोबस्तात पैसे वाटतो; संजय राऊत
विनोद तावडेंची बॅग कोण तपासणार? उद्धव ठाकरेंचा निवडणूक आयोगाला सवाल
टिकटॉक स्टार इम्शा रहमानंतर प्रसिद्ध अभिनेत्रीचा MMS लीक