सर्वत्र चर्चेत असणारा आणि अमेरिकेत Apple च्या App Store वर OpenAI च्या ChatGPT ला मागे टाकणाऱ्या चीनी AI मॉडेल DeepSeek (DeepSeek banned)बाबत एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. यूएस नेव्हीने चीनी AI मॉडेल DeepSeek वर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय काही कठोर नियम देखील जारी करण्यात आले आहेत.

अचानक AI मॉडेलची वाढलेली लोकप्रियता आणि करण्यात आलेल्या आरोपांमुळे अनेकांनी (DeepSeek banned)DeepSeek बाबत चिंता व्यक्त केली आहे. त्यामुळे आता या सर्व प्रकरणावर उपाय म्हणून DeepSeek वर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
अलीकडेच लाँच झालेल्या DeepSeek ने काहीच काळात प्रचंड प्रगती केली आहे. DeepSeek ने अमेरिकेत Apple च्या App Store वर जगातील पहिलं AI मॉडेल ChatGPT देखील मागे टाकलं. DeepSeek हे चिनी एआय ॲप अलीकडे तंत्रज्ञान जगतात चर्चेचा विषय बनले आहे.
त्याच्या लोकप्रियतेसोबतच सुरक्षा आणि नैतिकतेबद्दलची चिंताही वाढत आहे. अलीकडेच, यूएस नेव्हीने आपल्या सदस्यांना डीपसीकचा वापर न करण्याची सक्त ताकीद दिली आहे. तसेच नेव्हीने काही कठोर नियम देखील जारी केले आहेत.
यूएस नेव्हीने आपल्या कर्मचाऱ्यांना एक ईमेल पाठवून चीनी AI मॉडेल DeepSeek वापरणे टाळण्यास सांगितले आहे. नौदलाने चेतावणी दिली आहे की हे मॉडेल सुरक्षेच्या दृष्टिकोनातून धोकादायक असू शकते, म्हणून ते कामासाठी किंवा वैयक्तिक वापरासाठी डाउनलोड किंवा इंस्टॉल करू नये.
DeepSeek एक ओपन-सोर्स AI मॉडेल आहे, याचा अर्थ कोणीही ते विनामूल्य वापरू शकतो. आणि याच कारणामुळे DeepSeek प्रचंड लोकप्रिय झाला आहे.
DeepSeek बाबात एक खास गोष्ट म्हणजे हा AI फक्त 6 मिलियन डॉलर्स म्हणजेच जवळपास 50 कोटी रुपये खर्चून तयार करण्यात आला आहे, हा खर्च OpenAI आणि Google सारख्या दिग्गजांपेक्षा खूपच कमी आहे. डीपसीकच्या या यशाचा आर्थिक बाजारांवरही परिणाम झाला, जेव्हा बातमी आली की कंपनीने हा AI अत्यंत कमी खर्चात विकसित केला आहे, तेव्हा Nvidia आणि Broadcom सारख्या AI चिप बनवणाऱ्या कंपन्यांचे शेअर्स पडले.
सध्या प्रचंड चर्चेत असणाऱ्या DeepSeek बद्दल आता अखेर यूएस नेव्हीने एक कठोर निर्णय घेतला आहे. यूएस नेव्हीच्या ईमेलमध्ये डीपसीकबद्दल गंभीर इशारा देण्यात आला आहे. ईमेलमध्ये म्हटले आहे की, एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे, ज्याबद्दल आता आम्ही तुम्हाला जागरूक करू इच्छितो, हे अपडेट नवीन AI मॉडेल DeepSeek शी संबंधित आहे.
यूएस नेव्हीने AI मॉडेल DeepSeek वर बंदी घालण्याचा निर्णय घेतला असून कोणताही कर्मचारी ह्या AI मॉडेलचा वापर करणार नाही, मग ते कामाशी संबंधित असो किंवा वैयक्तिक वापरासाठी. हे स्पष्ट आहे की अमेरिका या चीनी एआय ॲपबद्दल सावध आहे आणि त्याच्या सुरक्षेबाबत तडजोड करू इच्छित नाही.
हेही वाचा :
धक्कादायक ! २३ वर्षीय रशियन तरुणीसोबत भररस्त्यात भयंकर प्रकार…
…जर कोणी खंडणी मागितली तर ; बीडच्या पहिल्याच दौऱ्यात अजित पवारांचा पदाधिकाऱ्यांना दम
भाजप-ठाकरे यांच्या युतीच्या ‘सुवर्णक्षणांची’ मुहूर्तमेढ पुन्हा रोवली जाणार? : संजय राऊत