विधानसभा निवडणुका(current political news) जाहीर झाल्यापासून उद्धठ ठाकरे भाजपसोबत पुन्हा जाणार का? याची चर्चा जोरात सुरू आहे. मात्र सत्तास्थापनेसाठी नसलं तरी सिल्लोडमध्ये भाजप-ठाकरे एकत्र येण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे यांनी तसे संकेत दिले आहेत. सिल्लोडमध्ये अब्दुल सत्तारां उद्धव ठाकरे यांनीच भाजपला हाक दिली आहे. निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असताना उद्धव ठाकरे यांनी आपले मतभेद बाजूला ठेवू पण एकत्र येऊ असं जाहीरपणे म्हटल्यामुळे पुन्हा चर्चांना उधाण आलं आहे.
काही दिवसापूर्वी भाजपच्या(current political news) स्थानिक पदाधिकाऱ्यांनी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून आम्ही अब्दुल सत्तार यांचा प्रचार करणार नाही असे स्पष्टपणे कळवलं होतं. दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या प्रचार सभेत मंचावर आणि समोरील गर्दीतही पदाधिकारी आणि कार्यकर्तेही उपस्थित होते.
एकीकडे दररोज मोदी शहा फडणवीसांवर उद्धव ठाकरे हे हल्लाबोल करत आहेत पण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड विधानसभा मतदारसंघात त्यांनी भाजपाला सोबत येण्याचं आवाहन केलं. गद्दाराला गाडण्यासाठी, गुंडगिरी आणि सर्वसामान्याच्या छळ थांबवण्यासाठी एकत्र येऊ, असं ठाकरे म्हणाले आहेत.
हेही वाचा :
‘स्वप्न पूर्ण होतात’, प्रियंका, दीपिका-आलियानंतर हॉलिवूडमध्ये ही अभिनेत्री करणार डेब्यू
पाकिस्तानी चाहत्याकडून मीका सिंगला भेट: 3 कोटींचं घड्याळ, सोनं आणि हिऱ्याची अंगठी
सातारच्या पावसाची पुनरावृत्ती इचलकरंजीच्या निकालाची पुनरावृत्ती करणार…..?