आजपासून जुलै महिना चालू झाला आहे. या महिन्यात आर्थिक व्यवहाराशी (Paytm)संबंधित अनेक नियम बदलले आहेत. हे नियम माहिती नसतील तर तुमच्या खिशावर परिणाम होण्याची शक्यत आहे. याच महिन्यात 31 जुलैपर्यंत तुम्हाला आयटीआर भरता येणार आहे.
31जुलैपर्यंत तुम्ही आयटीआर न भरल्यास तुम्हाला(Paytm) दंडाची रक्कम भरून आयटीआर भरावा लागेल. 31 तारीख जशी-जशी जवळ येईल, तसे तसे आयटीआर भरणाऱ्यांची संख्या वाढत जाईल. विशेष म्हणजे फक्त आयटीआरच नाही तर पैशाच्या व्यवहारासंबंधी इतरही नियम बदलणार आहेत. यात प्रामुख्याने चार तारखा तुम्ही लक्षात ठेवणे गरजेचे आहे. या तारखा लक्षात न ठेवल्यास तुम्हाला आर्थिक भुर्दंड सोसावा लागू शकतो.
आयकर विवरणपत्र (आयटीआर) भरण्याची अंतिम मुदत:
आर्थिक वर्ष २०२३-२४ करिता आयटीआर भरण्याची अंतिम मुदत ३१ जुलै २०२४ आहे. या तारखेनंतर आयटीआर भरल्यास दंड आकारला जाईल.
पेटीएम वॉलेट बंद होणार:
पेटीएमने एक मोठा निर्णय घेतला आहे. जे वॉलेट एका वर्षापेक्षा अधिक काळापासून सक्रिय नाीहीत, तसेच अशा वॉलेट्समध्ये शून्य बॅलेन्स आहे, त्या सर्व वॉलेट्सना 20 जुलैपासून बंद करण्यात येणार आहे. असे वॉलेट्स असणाऱ्यांना याबाबतची सूचना दिली जाईल. तसेच वॉलेट बंद करण्याआधी 30 दिवसांची नोटीस दिली जाईल.
एसबीआय क्रेडिट कार्ड नियम:
स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) ने काही क्रेडिट कार्डवर रिवॉर्ड पॉइंट्स देण्याची सुविधा बंद केली आहे. हा बदल १ जुलैपासून लागू झाला आहे.
आयसीआयसीआय बँक क्रेडिट कार्ड नियम:
आयसीआयसीआय बँकेनेही १ जुलैपासून आपल्या विविध क्रेडिट कार्डच्या सेवा शुल्कात बदल केले आहेत. एमराल्ड प्रायव्हेट मेटल क्रेडिट कार्ड वगळता इतर सर्व कार्ड्सच्या ट्रान्सफर शुल्क २०० रुपये करण्यात आले आहे.
सिटी बँक क्रेडिट कार्डचे अॅक्सिस बँकेत स्थलांतर:
सिटी बँकेच्या क्रेडिट कार्डचे अॅक्सिस बँकेत स्थलांतर करण्याची प्रक्रिया १५ जुलैपर्यंत पूर्ण होणार आहे. या महत्त्वाच्या तारखा लक्षात ठेवून वेळेत आवश्यक कार्यवाही करा आणि आर्थिक नुकसान टाळा.
हेही वाचा :
महाराष्ट्रात शेतकऱ्यांसाठी सरकारच्या योजनेमुळे लाखों शेतकरींना मिळणार लाभ
संभाजी भिडे यांच्या ‘दळभद्री स्वातंत्र्य’ वक्तव्यावरून वादंग, विरोधकांची टीका
पलक तिवारीच्या फोटोंवर इब्राहिम अली खानची ‘फायर’ कमेंट, नेटकरी म्हणाले “रिलेशनशिप कन्फर्म?”