ऐन दिवाळीत अनेक राज्यांत फटाक्यांनाच बंदी; तर काही राज्यांत वेळेची मर्यादा…

नवी दिल्ली : दिवाळी(festival) हा सण मोठा असा साजरा केला जातो. त्यात जसजशी जवळ येत आहे, तसतसे प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर अनेक राज्ये फटाक्यांबाबत कडक नियम लागू करत आहेत. दिल्लीत संपूर्ण बंदी आहे, तर बिहार आणि महाराष्ट्रासारख्या राज्यांनी उत्सवादरम्यान हवेची गुणवत्ता राखण्यासाठी ठराविक तासांमध्ये फटाके फोडण्याचे आदेश जारी केले आहेत.

राजधानी दिल्लीमध्ये दर हिवाळ्यात तीव्र हवेच्या गुणवत्तेचा सामना करणाऱ्या दिल्ली प्रदूषण नियंत्रण समितीने 1 जानेवारी 2025 पर्यंत फटाक्यांची निर्मिती, साठवणूक, विक्री आणि वापर यावर पूर्ण बंदी घातली आहे. यामध्ये ऑनलाईन विक्रीचाही समावेश आहे. कमी हानीकारक असलेले फक्त ‘हिरवे फटाके’ मर्यादित तासांत फोडण्याची परवानगी असेल. दिवाळीत रात्री 8 ते 10 या वेळेत फटाके फोडता येतात. हे हिरवे फटाके बेरियम आणि शिसे यांसारख्या विषारी रसायनांपासून मुक्त असतात.

कर्नाटकात, राज्य सरकार रहिवाशांना दिवाळीत(festival) फक्त हिरवे फटाके वापरण्यास प्रोत्साहित करत आहे. पर्यावरणमंत्र्यांनी रात्री 8 ते 10 या वेळेत फटाके फोडण्याची वेळ निश्चित केली आहे. कोणतीही औपचारिक बंदी जारी करण्यात आलेली नाही. बिहारमध्ये अधिकाऱ्यांनी पाटणा, गया, मुझफ्फरपूर आणि हाजीपूर सारख्या प्रमुख शहरांमध्ये हिरव्या फटाक्यांसह सर्व प्रकारच्या फटाक्यांवर पूर्ण बंदी घातली आहे.

महाराष्ट्रातही अशाच प्रकारचे नियम पाळण्यात येत आहे. फक्त हिरव्या फटाक्यांना परवानगी आहे, जे इतर पर्यायांपेक्षा सुमारे 30 टक्के कमी प्रदूषण करतात. असे असतानाही अवैध फटाक्यांच्या विक्रीमुळे वेगळे आव्हान कायम आहे. यावर उपाययोजना करण्यासाठी अधिकारी दक्ष आहेत. त्यात महाराष्ट्रात फटाक्यांसाठी स्वतंत्र नियमावली असून, त्यानुसार, पावले उचलली जात आहेत.

हेही वाचा :

कोल्हापुरात टेम्पो-दुचाकीत भीषण अपघात; पतीचा जागीच मृत्यू तर पत्नी…

Lucknow Super Giants मधून के एल राहुलचा पत्ता कट?

पेट्रोल आणि डिझेल ५ रुपयांनी स्वस्त होणार? पेट्रोलियम मंत्र्यांकडून दिवाळीचं मोठ गिफ्ट