नाशिकमध्ये एक विचित्र घटना समोर आली आहे. गल्लीत राहायचं असेल तर एक लाख रुपये खंडणी दे अशी धमकी देत किराणा व्यवसायिकाच्या घरावर दगडफेक(stones) करण्यात आली आहे. या दुकानदाराच्या कारचीही तोडफोड करण्यात आली असून धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे.

गल्ली राहयचे असेल तर एक लाखांची खंडणी द्यावी लागले अशी धमकी देत एका सराईत आरोपीने किराणा व्यावसायिकाच्या घरावर दगडफेक(stones) केली. या व्यवसायिकाच्या कारची तोडफोड करत दहशत निर्माण केल्याचा प्रकार नाशिकच्या सराफ बाजारात घडला आहे.
संशयिताच्या विरोधात सरकारवाडा पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विराज उर्फ राज जगदीश जंगम असे या संशयिताचे नाव आहे. संशयित फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
दगडफेकीची घटना घराबाहेर लावलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. तिळभांडेश्वर मंदीर येथे राहणारे राहुल तिवारी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, सराफ बाजार परिसरात त्यांचे किराणा आणि जनरल स्टोअर्स दुकान होते. संशयित नेहमी दुकानावर येऊन त्यांच्याकडून किराणा माल, अन्य वस्तू बळजबरीने घेऊन जात होता.
भीतीपोटी तिवारी यांनी कधी या आरोपीविरोधात कधी तक्रार दाखल केली नाही. वडील वारल्यानंतर तिवारी यांनी हे दुकान बंद केले. संशयिताने घरी येऊन येथे राहयचे असेल तर एक लाख खंडणी द्यावी लागले अशी धमकी दिली. “उद्या सकाळपर्यंत पैसे मिळाले नाही तर उद्या ट्रेलर दाखवतो. पैसे दिले नाही तर जीव घेतो,” अशी धमकी देऊन निघून गेला.
सायंकाळी तिवारी यांचा मुलगा अथर्वला संशयिताने मारहाण केली. “हा फक्त ट्रेलर होता अशी पुन्हा धमकी दिली. रात्री पुन्हा तिवारी यांच्या घराजवळ येऊन घरावर दगडफेक(stones) करत शिविगाळ केली. तिवारी यांची गाडगे महाराज पुलाजवळ उभी केलेली थार गाडीची तोडफोडही आरोपीने केल्याचे तिवारी यांनी तक्रारीत म्हटलं आहे. याबाबत तिवारींनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. दर प्रकरणामध्ये पोलीस तपास करत असल्याची माहिती सरकारवाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड यांनी दिली.
हेही वाचा :
‘लाडक्या बहिणी’चे पैसे पतीने दारुवर केले खर्च; जाब विचारताच पत्नीवर कोयत्याने वार
MI vs CSK सामन्यात मुंबई इंडियन्सचा कॅप्टन कोण? रोहित शर्माच्या नावावर फुली!
महिला पोलिसाची वर्दी खेचत विनयभंग; हिंसाचार करणाऱ्यांकडून अश्लील शिविगाळ अन् चाळे