भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर गावसकर ट्रॉफीचा पहिला सामना 22 नोव्हेंबर पासून पर्थ येथे खेळवला जात आहे. या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी टीम इंडियाचा स्टार फलंदाज यशस्वी जयस्वाल आणि विराट कोहलीने(Virat Kohli) शतकीय खेळी केली. विराटने त्याच्या आंतरराष्ट्रीय करिअरमधील 80 वं शतक ठोकलं.
या शतकानंतर त्याने स्टॅन्डमध्ये उपस्थित असलेली पत्नी अनुष्का शर्मा हिला फ्लायिंग किस देऊन सेलिब्रेशन केले. या दरम्यान कॅमेऱ्यात विराट (Virat Kohli)अनुष्काचा मुलगा अकाय कोहली याची पहिली झलक समोर आली. सध्या त्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली हा पर्थ टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये फलंदाजी करताना अवघ्या 5 धावा करून बाद झाला होता. त्यावरून विराटला सोशल मीडियावर मोठ्या ट्रोलिंगला समोर जावं लागलं होतं. मात्र दुसऱ्या इनिंगमध्ये विराटने ही कसर भरून काढली आणि थेट नाबाद शतक ठोकलं. विराटचं टेस्ट क्रिकेटमधील हे 30 वं तर आंतरराष्ट्रीय क्रिकेट करिअरमधील 80 वं शतक ठरलं. हे शतक विराटने 143 बॉलमध्ये पूर्ण केलं दरम्यान त्याने 8 चौकार आणि 2 षटकार ठोकले.
टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने शतक ठोकल्यावर त्याने मैदानात सेलिब्रेशन केलं. यावेळी टीम इंडियाने त्याला स्टँडिंग ओव्हेशन दिलं. दरम्यान यावेळी विराटची पत्नी अनुष्का शर्मा सुद्धा मैदानात हजर होती. स्टॅन्डमध्ये बसलेल्या अनुष्काला पाहून विराटने फ्लायिंग किस दिलं. यावेळी अनुष्काच्या मागे एक व्यक्ती हातात बाळ घेऊन उभा होता. या बाळाचा फोटो समोर आल्यावर अनेकांनी तो विराट अनुष्काचा मुलगा अकाय कोहली आहे असेच म्हटले.
सोहळ मीडियावर हा फोटो वेगाने व्हायरल होतं आहे. परंतु विराट अनुष्काकडून अद्याप हा फोटो अकायचाच आहे असं स्पष्ट करण्यात आलेलं नाही. यापूर्वी एका सामन्यादरम्यान अशाच प्रकारे विराट अनुष्काची मुलगी वामिका हीच फोटो सुद्धा समोर आला होता. त्यावेळी विराट आणि अनुष्काने आपल्या मुलीचा चेहरा दिसत असलेला फोटो परवानगी शिवाय काढला गेल्याचे सांगितले होते आणि तो व्हायरल करू नये अशी विनंती चाहत्यांना आणि मीडियाला केली होती. विराट कोहलीचा मुलगा अकाय याचा जन्म फेब्रुवारी 2023 मध्ये झाला.
हेही वाचा :
राज्यातील ‘या’ 20 जिल्ह्यातून काँग्रेस हद्दपार?
‘कोण किशोर कुमार?’ आलिया भट्टच्या प्रश्नानं रणबीरला बसला धक्का
नाना पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देणार? विधासभेतील अपयशानंतर पटोलेंचा मोठा निर्णय