बिग बॉस मराठी 5 चा विजेता सूरज चव्हाण सध्या त्याच्या आगामी (dialogue)चित्रपट ‘झापूक झुपूक’ मुळे चर्चेत आहे. या सिनेमाची पहिली झलक नुकतीच सोशल मीडियावर शेअर करण्यात आली असून, या झलकने चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण केली आहे. सिनेमाचा टीझर लवकरच प्रदर्शित होणार असल्याचे संकेत दिले गेले आहेत. विशेष म्हणजे, या व्हिडीओत सूरजचा प्रसिद्ध ‘एका बुक्कीत टेंगुळ’ हा डायलॉग ऐकायला मिळतो, ज्यामुळे चाहत्यांचा उत्साह आणखी वाढला आहे.

व्हिडीओमध्ये काय आहे खास? :
सूरज चव्हाणने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या पहिल्या झलक व्हिडीओत तो कलरफुल शर्ट घालून नाचताना दिसतो. संपूर्ण व्हिडीओ अतिशय रंगतदार असून, त्याला आकर्षक पार्श्वसंगीताची जोड देण्यात आली आहे. वेगवान एडिटिंग, झपाट्याने बदलणारी दृश्ये आणि अनोख्या पार्श्वभूमीतील पात्र (dialogue)यामुळे हा चित्रपट एका वेगळ्या कथानकावर आधारित असण्याची शक्यता आहे.
चित्रपटाचे नाव ‘झापूक झुपूक’ असल्याने हा एक हटके आणि विनोदी चित्रपट असणार, असा अंदाज लावला जात आहे. चित्रपटाच्या कथानकाबाबत फारशी माहिती उघड करण्यात आलेली नाही, मात्र टीझर रिलीज झाल्यानंतर कथेबाबत अधिक माहिती मिळेल. बिग बॉस नंतर सूरज चव्हाणने मोठ्या पडद्यावर दमदार एन्ट्री घेतली आहे, त्यामुळे त्याच्या चाहत्यांना या सिनेमाची प्रचंड प्रतीक्षा आहे.
सिनेमाच्या पहिल्या झलक व्हिडीओने सोशल मीडियावर धुमाकूळ (dialogue)घातला आहे. सूरज चव्हाणचे चाहते मोठ्या प्रमाणावर कमेंट्स आणि शेअर्स करत आहेत. अनेकांनी “हा सिनेमा झपाटून टाकणार!” असे लिहिले आहे, तर काहींनी टीझर लवकर रिलीज करण्याची मागणी केली आहे.सिनेमाचा टीझर लवकरच प्रदर्शित केला जाणार आहे, तर ‘झापूक झुपूक’ हा सिनेमा 25 एप्रिल 2025 रोजी रिलीज होणार आहे.
हेही वाचा :
रोहित शर्माच्या कर्णधारपदावर मोठा निर्णय…
कोल्हापूर-सांगली महामार्ग बंद करण्याचा इशारा, राजू शेट्टींच्या घरी पोलिस पोहोचले
इतका माज येतो कुठून? मद्यधुंद अवस्थेत तरुणाने चौघांना उडवलं Video Viral