आधी आई, आता लेक… ‘पुष्पा २’च्या चेंगराचेंगरीत जखमी मुलगा ब्रेन डेड

‘पुष्पा २’च्या प्रीमियर दरम्यान, हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये(Entertainment news) चेंगराचेंगरीमध्ये एका महिलेचा मृत्यू झाला होता, तर तिचा मुलगा गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर गेल्या अनेक दिवसांपासून हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. आता त्याच्याबद्दल महत्वाची माहिती समोर आली आहे. ‘पुष्पा २’च्या प्रीमियर दरम्यान, हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये चेंगराचेंगरीमध्ये जखमी झालेल्या मुलाचं नाव श्रीतेज असं होतं. त्या श्रीतेजचं डॉक्टरांकडून ब्रेन डेड घोषित करण्यात आलेलं आहे. तो ९ वर्षांचा होता.

४ डिसेंबर रोजी हैदराबादच्या (Entertainment news)संध्या थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये श्रीतेजची आई एम. रेवती हिचा मृत्यू झाला होता. तर श्रीतेज गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर गेल्या अनेक दिवसांपासून श्रीतेजावर सिंकदराबादच्या KIMS कडल्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. पीड्रियाटिक इंटेन्सिनव्ह केअर युनिट मध्ये त्याच्यावर व्हेंटिलेटरच्या आधारावर त्याच्यावर उपचार सुरू होते. हैदराबाद शहराचे पोलिस आयुक्त सी.व्ही.आनंद आणि तेलंगणा सरकारचे आरोग्य सचिव आयएएस ऑफिसर डॉ.क्रिस्टीना यांनी श्रीतेजाच्या मुलाच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी KIMS हॉस्पिटलला भेट दिली.

त्यांनी पोस्ट शेअर करत माहिती दिली की, “डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीतेजवर लहान मुलांच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. त्याला ऑक्सिजन सपोर्ट द्यावा लागत आहे. त्याचा ताप कमी होत आहे. त्याचे महत्त्वाचे पॅरामीटर्स स्थिर आहेत. तो उपचारांना प्रतिसाद देत आहे. त्याची स्थिर न्यूरोलॉजिकल स्थिती लक्षात घेता, व्हेंटिलेटर काढून ट्रेकिओस्टॉमी वैद्यकीय प्रक्रिया केली जाणार आहे.”

४ डिसेंबर रोजी संध्या थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत श्रीतेजला ऑक्सिजनची कमतरता आणि श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. १० डिसेंबरला त्याला ऑक्सिजन सपोर्टवरून काढून टाकण्यात आले होते, मात्र १२ डिसेंबरला त्याची प्रकृती पुन्हा बिघडली. दरम्यान, हैदराबाद शहराचे पोलिस आयुक्त सी.व्ही.आनंद यांनी हॉस्पिटलला भेट दिली, त्यानंतर त्यांनी सांगितले की श्रीतेजला श्वासाच्या कमतरतेमुळे ब्रेन डेड झाले आहे आणि त्याला बरे होण्यासाठी बराच वेळ लागेल.

‘पुष्पा २’ च्या स्क्रिनिंगवेळी झालेल्या चेंगराचेगरीत अभिनेता अल्लू अर्जुनला हैदराबादमधून अटक करण्यात आली होती. एक रात्र जेलमध्ये काढल्यानंतर त्याची जामीनावर सुटका करण्यात आली होती. नंतर, अभिनेत्याने त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर जखमी मुलाबद्दल चिंता व्यक्त करणारी पोस्ट शेअर केली होती. पोस्टमध्ये तो म्हणाला की, श्रीतेजवर चालू असलेल्या वैद्यकीय उपचारामुळे रुग्णालयात त्याला न भेट देण्याचा सल्ला देण्यात आला आहे. अल्लू अर्जुनने पीडितेच्या कुटुंबीयांना २५ लाख रुपयांच्या नुकसानभरपाईसह सर्वतोपरी मदत जाहीर केली आहे.

हेही वाचा :

महाराष्ट्र हादरलं! नृत्य प्रशिक्षकाचा चिमुकल्या विद्यार्थिनींवर अत्याचार, पालक संतप्त

बाईकवरुन पडल्याचा दोष बायकोला? नवऱ्याच्या विचित्र प्रतिक्रियेचा व्हिडिओ व्हायरल

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदासाठी ‘हे’ 5 दिग्गज नेते शर्यतीत! कोणाची वर्णी लागणार?