बहुप्रतिक्षित क्षण शेवटी आज उजाडला. सोभिता धुलिपाला आणि नागा चैतन्य यांचा विवाह(Wedding) सोहळा हैदराबादच्या अन्नपूर्णा स्टुडिओमध्ये पार पडला. वधू म्हणून शोभिता आणि वर म्हणून नागा चैतन्य यांची पहिली छायाचित्रे आता समोर आली आहेत. सोभिताचा सासरा नागार्जुन याने आपल्या इन्स्टाग्रामवरून लग्नाचा सुंदर इन्स्टाग्राम व्हिडिओ शेअर केलाय.
शोभिता पारंपारिक कांजीवरम सिल्क साडी नेसल्यामुळे खूपच सुंदर दिसत आहे. आणि यासह तिने हेवी ज्वेलरीसह तिचा ब्राइडल लुक ऍक्सेसरीझ केला होता. नागा चैतन्यने त्याच्या आजोबांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पंचादेखील घेतला होता. व्हायरल झालेल्या फोटोमध्ये नागार्जुन आपल्या मुलाच्या जवळ उभा असलेला दिसत आहे. पाहा सोभिता आणि नागाच्या लग्नाचे(Wedding) खास फोटो.
सोभिताने पारंपरिक गोल्डन कांजीवरम नेसून सर्वांचे लक्ष वेधून घेतलंय. तर तिचा हा लुक अत्यंत आकर्षक आणि पाहतच राहण्यासारखा आहे. तिच्या सौंदर्यावरून नजरच हटत नाहीये. गेल्या आठवड्यापासूनच सोभिता आणि नागाच्या पारंपरिक लग्नसोहळ्याच्या विधींना सुरूवात झाली होती. सोभिताने सर्व विधीपूर्वक कार्य केल्याचे दिसून येत आहे. तर नागाने तिला मॅच होईल असाच लुक केलाय.
सोभिताने आपल्या लग्नात दाक्षिणात्य पद्धतीने तयार कऱण्याले आलेले सर्व सोन्याचे दागिने परिधान केले होते. गोल्डन कांजीवरमसह हे दागिने अधिक उठावदार आणि आकर्षक दिसून येत आहे. तिने दाक्षिणात्य पद्धतीचा संपूर्ण मांगटिका घातला असून यासह सोन्याचे हेव्ही झुमके, गळ्यात मोठे हार, नेकलेस याचा वापर केलाय. तर हातात सोन्याच्या बांगड्या घालून ब्रायडल लुक पूर्ण केलाय. नाकात तिने दाक्षिणात्य पद्धतीची सोनेरी नथ घातली आहे, जी दोन्ही नाकपुड्यांमध्ये घातली जाते, त्याने अधिक शोभा वाढते. तर नागा आणि सोभिताच्या कपाळावरही दाक्षिणात्य पद्धतीने दोरा बांधण्यात आला आहे.
सोभितासह नागा चैतन्यने मॅच होईल असा ग्रुम लुक केला असून सोभिताचा ब्रायडल मेकअपही अत्यंत क्लासी असल्याचे दिसून येत आहे. गोल्डन कांजीवरमसह शोभेल असा मिनिमल मेकअप तिने केलाय. फाऊंडेशन, हायलायटर, काजळ, आयलायनर, आयशॅडो आणि डार्क ब्राऊन लिपस्टिक लावत अगदी भारतीय नवरीप्रमाणे सोभिता सजली आहे. परफेक्ट दाक्षिणात्य लुकमध्ये सोभिताने सर्वांचे मन जिंकून घेतलंय.
नागा चैतन्य आणि शोभिता धुलीपालाची 8 ऑगस्ट रोजी एंगेजमेंट झाली. नागार्जुनने X वर आनंदाची बातमी जाहीर केली. त्याने लिहिले, “आम्हाला आमचा मुलगा नागा चैतन्य आणि शोभिता धुलीपाला यांची आज सकाळी 9:42 वाजता एंगेजमेंट झाली असून घोषणा करताना आनंद होत आहे आणि आमच्या कुटुंबात तिचे स्वागत करताना आम्हाला खूप आनंद होत आहे आणि त्यांना आयुष्यभरासाठी शुभेच्छा असून त्यांनी आनंदी आहे हीच इच्छा अशा भावना व्यक्त केल्या
हेही वाचा :
शपथविधीपूर्वीच सोनं झालं स्वस्त, ‘इतक्या’ रुपयांनी घसरले भाव
“2100 रुपयांचा हप्ता मिळणार का? महायुती नेत्याचा 15 लाखांचा उल्लेख चर्चेत”
निम्म्या राज्यावर वादळी पावसाचं सावट; थंडीचं पुनरागमन कधी?