ब्रेकिंग! देशातील पहिला निकाल लागला; मतमोजणी आधीच भाजपने खातं खोललं

देशभरातील सार्वत्रिक निवडणुकांचे निकाल आज समोर येत आहे(country). अवघ्या काही तासात मतमोजणीला सुरूवात होणार असून मतदार राजा कुणाला कौल देणार? याकडे सर्व देशाचे लक्ष लागले आहे. तत्पुर्वी भारतीय जनता पक्षाने निकालाआधीच गुजरातमधील एका लोकसभेत विजय मिळवून पहिला गुलाल उधळला आहे.

देशातील लोकसभा निवडणुकांची मतमोजणी काही वेळात सुरू(country) होणार आहे. मात्र मतमोजणी सुरू होण्याआधीच भारतीय जनता पक्षाने एका जागेवर विजय मिळवला आहे. गुजरातमधील सुरत लोकसभा मतदार संघात भारतीय जनता पक्षाचे मुकेश दलाल हे बिनविरोध निवडून आले आहेत. याठिकाणी काँग्रेस उमेदवार निलेश कुंभानी यांचा अर्ज बाद ठरवण्यात आला होता.

प्रमुख विरोधी उमेदवाराचा अर्जच बाद झाल्यामुळे दलाल यांचा विजय निश्चित होता. तर निलेश कुंभानी यांचा अर्ज बाद झाल्यानंतर या ठिकाणी निवडणूक लढवणाऱ्या अपक्ष उमेदवारांनीही आपले अर्ज माघारी घेतले. त्यामुळे निलेश कुंभानी यांचा विजय झाला. या विजयासोबतच भारतीय जनता पक्षाने लोकसभा निकालाआधीच गुलाल उधळत खाते खोलले आहे.

दरम्यान, देशभरात आज लोकसभेच्या निकालाचा धुरळा पाहायला मिळणार आहे. ४०० पारचा नारा दिलेला भाजप पुन्हा हॅट्रिक साधणार की इंडिया आघाडी धक्का देणार? याबाबतचे चित्र अवघ्या काही तासांमध्ये स्पष्ट होणार आहे.

हेही वाचा :

प्रासंगिक – ‘अभया’ संस्थेची दशकपूर्ती आणि वाटचाल

मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर आज अटल सागरी सेतू वाहतुकीसाठी बंद;

सरकारचे दुष्काळाकडे दुर्लक्ष, मला संघर्षाची भूमिका घ्यावी लागेल;