नांदेड : काँग्रेसचे देगलूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार जितेश अंतापूरकर (political news todays)यांनी आपल्या पक्ष सदस्यत्त्वाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून ते काँग्रेस हाय कमांडच्या रडारवर आल्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती.
दोन महिन्यांपूर्वी झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या(political news todays) पाच आमदारांनी क्रॉस वोटिंग केल्याचा संशय व्यक्त कऱण्यात आला होता. त्यात जितेश अंतापूरकर आणि हिरामण खोसकर यांच्यावर दाट संशय होता. त्यानंतर जितेश अंतापूरकर आणि हिरामण खोसकर यांच्यासह आणखी काही जणांची नावे समोर आली. ते कधीही काँग्रेसची साथ सोडतील अशाही चर्चा सुरू झाल्या. त्यानंतर काही दिवसातच अंतापूरकर यांनी सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याचे समोर आले.
मुख्यमंत्र्यांच्या भेटीसंदर्भात विचारले असता त्यांनी काँग्रेस पक्ष सोडण्याचे वृत्त फेटाळून लावले होते.आपण आपल्या मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या समस्यांविषयी चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. पण आता त्यांच्या राजीनाम्यामुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू झाली आहे. आज (30 ऑगस्ट) दुपारी दोन वाजता भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचेही सांगितले जात आहे.
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून तिकीट नाकारले जाण्याच्या भीतीने जितेश अंतापूरकर यांनी हे पाऊल उचलल्याची चर्चा आहे. एका माहितीनुसार, विधानपरिषद निवडणुकीत क्रॉस वोटिंग करणाऱ्या आमदारांमध्ये जितेश अंतापूरकर यांचा समावेश असल्याचा काँग्रेस नेत्यांना विश्वास होता. त्यानंतर काँग्रेसकडून फुटलेल्या आमदारांवर कारवाई करण्याचा निर्णय़ही घेण्यात आला. पण काँग्रेसने वेगळाच डाव टाकला. क्रॉस वोटिंग करणाऱ्या आमदारांर कारवाई करण्याऐवजी त्यांना गाफील ठेवून विधानसभा निव़डणुकीत त्यांना तिकीट दिले जाऊ नये, असा आदेशच हायकमांडकडून आला. त्यामुळे हा धोका लक्षात घेऊन जितेश अंतापूरकर यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचे निश्चित केल्याची सांगितले जात आहे.
हेही वाचा:
मुंबईने बीजिंगला मागे टाकले: आशियातील सर्वात जास्त अब्जाधीशांचे शहर
‘बिहार पॅटर्न’ला फाटा? संघाच्या सक्रियतेने मुख्यमंत्रीपदावर शिंदेंचा दावा संकटात