आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 (t 20)स्पर्धेसाठी सुपर 8 फेरीत पोहचणारी पहिली टीम निश्चित झाली आहे. या स्पर्धेतील 20 संघ 4 गटात 5-5 नुसार विभागण्यात आले आहेत. त्यानुसार प्रत्येक गटातील अव्वल 2 संघ सुपर 8 साठी क्वालिफाय करणार आहेत. दक्षिण आफ्रिकेने सोमवारी 10 जून रोजी विजय मिळवून सुपर 8 फेरीचं तिकीट मिळवलं. दक्षिण आफ्रिकेने यासह सुपर 8 मध्ये पोहचणारी पहिली टीम असा बहुमान मिळवला.
दक्षिण आफ्रिका विरुद्ध बांगलादेश यांच्यातील सामना हा नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये पार पडला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने बांगलादेशला विजयासाठी 114 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये केशव महाराज याने हुशारीने 11 धावांचा बचाव केला आणि दक्षिण आफ्रिकेला 4 धावांनी विजय मिळवून दिला. दक्षिण आफ्रिकेचा हा सलग तिसरा विजय ठरला. दक्षिण आफ्रिकेने विजयी हॅट्रिकसह सुपर 8 चं तिकीट मिळवलं. दक्षिण आफ्रिका डी ग्रुपमध्ये आहे.
तर ओमान साखळी फेरीतून बाहेर पडणारी पहिली टीम ठरली आहे. ओमान बी ग्रुपमध्ये आहे. ओमानला तिन्ही सामन्यात पराभूत व्हावं लागलं आहे. ओमानला सलामीच्या सामन्यात नामिबिया विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये पराभूत व्हावं लागलं. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने 39 धावांनी विजय मिळवला. तर स्कॉटलँडने ओमानचा तिसऱ्या सामन्यात पराभव केला होता. आता ओमानचा अखेरचा सामना हा इंग्लंड विरुद्ध 14 जून रोजी होणार आहे.
दरम्यान 11 जून रोजी पाकिस्तान विरुद्ध कॅनडा यांच्यात सामना होणार आहे. पाकिस्तानने आधीचे 2 सामने गमावले आहेत. त्यामुळे सुपर 8 मधील आव्हान कायम राखण्यासाठी पाकिस्तानसाठी हा सामना ‘करो या मरो’ असणार आहे. पाकिस्तान पराभूत झाली, तर ओमाननंतर स्पर्धेतून बाहेर पडणारी दुसरी टीम ठरेल.
बांगलादेश प्लेइंग ईलेव्हन: नजमुल हौसेन शांतो (कॅप्टन), तांझिद हसन, लिटॉन दास (विकेटकीपर), तौहीद ह्रदोय, शकीब अल हसन, जाकेर अली, महमुदुल्ला, रिशाद हुसेन, तस्किन अहमद, तनझिम हसन साकिब आणि मुस्तफिजुर रहमान.
दक्षिण आफ्रिका प्लेइंग ईलेव्हन : एडन मारक्रम (कॅप्टन), रीझा हेंड्रिक्स, क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), ट्रिस्टन स्टब्स, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को जॅनसेन, केशव महाराज, कागिसो रबाडा, एनरिच नॉर्खिया आणि ओटनील बार्टमन.
हेही वाचा :
मोठी बातमी! चीनकडून सोनं खरेदीला ब्रेक; सोन्याच्या , दरांवर परिणाम
रेणुका स्वामी मर्डर मिस्ट्रीत नवा ट्वीस्ट; प्रसिद्ध अभिनेत्याला अटक
इचलकरंजीत सवलतीच्या पास योजनेची सुविधा उपलब्ध….