राज्याच्या विधानसभेचं (political news)चित्र आता स्पष्ट झालं आहे. महायुतीने मुसंडी मारत महाविकास आघाडीला चारीमुंड्या चीत केलं. या निवडणुकीत काँग्रेसच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीचा अत्यंत लाजिरवाणा पराभव झाला. काँग्रेसला फक्त 15 जागा जिंकता आल्या. तर ठाकरे गटालाही फक्त 20 जागा मिळाल्या.

एकूण महाविकास आघाडीला अवघ्या 49 जागा मिळाल्या. या निकालानंतर महाविकास आघाडीच(political news) अस्वस्थता वाढली आहे. यातच महायुतीतील शिंदे गटाच्या नेत्यानं केलेल्या विधानाने मोठी खळबळ उडाली आहे. ठाकरे गटाचे पाच आमदार आमच्या संपर्कात आहेत, असा दावा आमदार उदय सामंत यांनी केला आहे.
शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे पाच आमदार आमच्या संपर्कात आहेत. यावेळी दोन ते तीन सोडता सर्व आमदार आमच्याकडेच येतील. रात्रीपासूनच हे आमदार आमच्या संपर्कात आहेत असे उदय सामंत म्हणाले आहेत. त्यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. ठाकरे गटाला या निवडणुकीत सपाटून मार खावा लागला आहे. त्यामुळे ठाकरे गटात अस्वस्थता वाढली आहे. अशातच उदय सामंत यांनी केलेल्या वक्तव्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
ठाकरे गटाचे जे आमदार निवडून आले आहेत ते आमच्या संपर्कात आहेत. त्यातीलही काही आमदार आमच्याकडे येतील. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे योग्य तो निर्णय घेतील. ईव्हीएममध्ये गडबड असल्याचा आरोप समोरून केला जात आहेत. जो धनुष्यबाण दुसऱ्याच्या खांद्यावर होता तो आता आम्ही घेऊन आहोत. गद्दारी कुणी केली हे पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे, असेही सामंत म्हणाले.
हाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने राज्यात मोठे यश संपादन केले तर महाविकास आघाडीला मोठा फटका बसला. मनसे, वंचित बहुजन आघाडीला एकही जागा मिळता आली नाही. ठाकरे गटाने 95 जागा लढवल्या होत्या. यात फक्त 20 जागा जिंकता आल्या. शिवसेनेत फूट पडल्यानंतर मतदारांची सहानुभूती उद्धव ठाकरेंना मिळेल असे सांगितले जात होते. मात्र तसे काही घडले नाही.
हेही वाचा :
491 दिवसांनी संपली प्रतीक्षा! ‘किंग कोहली’चा धमाका
महिलेचा धावत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न अन्; व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले…
‘आमचा राजा हरला नाही, महाराष्ट्र हरलास तू’, राज ठाकरेंसाठी तेजस्विनी पंडितची भावनिक पोस्ट…